शेतकरी आंदोलन चिथावल्याचा आरोप असलेला दिप सिध्दू भाजपशी संबधित?

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर सध्या दीप सिद्धू हे नाव चर्चेत आहे. दिप सिद्धू हा प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव समोर येताच शेतकरी नेत्यांनी आपले हात वर केले आहे.

नवी दिल्ली: काल घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर सध्या दीप सिध्दू हे नाव चर्चेत आहे. दिप सिध्दू हा प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. या अभिनेत्याचे नाव समोर येताच शेतकरी नेत्यांनी आपले हात वर केले आहे. असा आरोप केला जात आहे की, या व्यक्तीने शेतकऱ्यांचे आंदोलन लाल किल्ल्याकडे वळवले, त्यानंतर हिंसाचार पसरला.

हा अभिनेता भाजप तसेच आरएसएसचा एजंट असल्याचेही आरोप आता होऊ लागले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवणाऱ्या विरोधकांच्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर पंजाबी अभिनेता दीप सिध्दू याने या प्रकरणाच्यावेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे कबूल केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी -

 

मंगळवारी संध्याकाळी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सिध्दू यांनी  ही योजनाबद्ध चाल नाही तेव्हा त्याला कोणताही जातीय रंग देण्याचा किंवा कट्टरपंथी म्हणून संबोधण्याचा प्रयत्न करू नये असा दावा केला आहे. “नवीन शेतकरी कायद्याविरूद्ध आमचा निषेध नोंदविण्यासाठी आम्ही 'निशानी साहिब आणि शेतकरी झेंडा लावला'  आणि किसान मजदूर असा नारा दिला होता."
सिध्दू, नंतर लखा सिधाना हे आणखी एक नाव पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ दीप सिध्दू आणि लाखा सिधाना यांनीच शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर जाण्यास प्रोत्साहन दिले होते असे म्हटले जात आहे. 

 

दीप सिध्दू हा पंजाबचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे पंजाबी चित्रपट पंजाबमध्ये खूप लोकप्रिय झालेले आहेत. अभिनेता सनी देओल 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उभा राहिला होता त्यानंतर त्याने अभिनेता दीपला निवडणूक प्रचारात सहभागी करुन घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंजाबी अभिनेता दीप आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यावर  दीप सिध्दू आणि माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असे सनी देओलने स्पष्ट केले आहे. दीप सिध्दू आधीपासूनच शेतकरी चळवळीशी जोडला गेलेला आहे. 25 सप्टेंबर रोजी दिल्ली-हरयाणा रस्त्यावरील शंभू येथे त्याने शेतकरी तसेच काही कलाकारांसोबत निदर्शनेसुद्धा केली आहे.

पाकिस्तानातून तब्बल 18 वर्षानंतर भारतीय महिलेची सुटका -

संबंधित बातम्या