अॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबांना बजावली नोटीस

दैनिक गोमंतक
बुधवार, 26 मे 2021

15 दिवसांत माफी मागितली नाही तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा आयएमएने रामदेव बाबांना दिला आहे.

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिऐशन (Indian Medical Association) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून,  बाबा रामदेव यांनी 15 दिवसांत माफी मागितली नाही तर त्यांच्यावर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा आयएमएने रामदेव बाबांना दिला आहे. अॅलोपॅथी औषधे (Allopathic Medicine) आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबांना नोटीस (Notice) बजाविण्यात आली आहे. 

या वक्तव्याबाबत रामदेव बाबांनी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून हे वक्तव्य आपण मागे घेत असल्याचे लिहिले होते. त्यानंतर त्यांनी अॅलोपॅथी औषधी कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला प्रश्न विचारले होते. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का असा सवाल देखील उपस्थित केला. अॅलोपॅथीचे उपचार इतके गुणकारी असतील तर त्यातील पारंगत डॉक्टरांनी आजारी पडणे योग्य वाटत नाही. असेही त्यांनी म्हणले होते. बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहित एक त्यांनी ट्वीट देखील केले आहे. यात ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे, 'डॉ. हर्षवर्धन जी आपले पत्र मिळाले.  चिकित्सा पद्धतीवरील संपूर्ण वादाला मी विराम देत आहे. त्याचबरोबर मी माझे वक्तव्य मागे देखील घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे किंवा आधुनिक उपचार पध्दतीचे विरोधक नाही. अॅलोपॅथीने देखील खूप प्रगती केली असून, त्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. मी जे वक्तव्य केले ते मला व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेज वारुन केले. जो मेसेज आला होता तो मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत वाचून दाखविला. यामागे माझा कोणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता, त्यातूनही जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर याचा मला खेद आहे. असे या पत्रात बाबा रामदेव यांनी नमूद केले आहे. 

होमिओपॅथीक औषध घेतल्यामुळे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

या पत्राला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, तुमचे हे वक्तव्य पूर्णपणे मागे घ्या. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणातून पूर्ण समाधान होत नाही. तुम्ही केलेले हे आपत्तीजनक वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल अशी आशा आहे. कोरोना काळात डॉक्टरांबाबत असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे. देवी, पोलिओ, इबोला, टीबी या सारख्या गंभीर आजारांवर अ‍ॅलोपॅथीक पद्धतीनेच मात करण्यात आली आहे. देशवासी आपल्या या वक्तव्याने खूप दुःखी झाले आहेत. कोरोना काळात अहोरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे देवदूत आहेत. अशा वेळी आपण असे वक्तव्य करुन त्यांचा अपमान केला आहे. आपल्या या स्पष्टीकरणाने त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत. असे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले. 

संबंधित बातम्या