'देशहिताशी तडजोड अथवा भारताचे नुकसान कदापि सहन करणार नाही' : संरक्षणमंत्री राजनाथसिंह

PTI
रविवार, 20 डिसेंबर 2020

कोणत्याही वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे, मात्र देशहिताच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि कोणतेही नुकसान सहन करणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल दिला.

हैदराबाद : कोणत्याही वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे, मात्र देशहिताच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि कोणतेही नुकसान सहन करणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल दिला. हैदराबाद येथील डिंडीगुळ येथे हवाई दलाच्या संयुक्त पदवी प्रदान सोहळ्यानमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोविडच्या काळात चीनने आपले मनसुबे जगाला दाखवून दिले, असेही ते म्हणाले. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की चीनबरोबरचा सीमा वाद भारताने समर्थपणे हाताळला आणि यातून भारत कमकुवत नाही, हे सर्वांना कळून चुकले. सीमेवरील कारवाया, घुसखोरी किंवा एकतर्फी कारवाईला भारत चोखपणे उत्तर देऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. पाकिस्ताबाबत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की आतापर्यंत पाकिस्तान चार युद्धात पराभूत झालाे. तरीही दहशतवादाच्या आड पाकिस्तान छुपे युद्ध लढत आहे. आपल्याला शांतता हवी, संघर्ष नको. परंतु देशहित व आत्मसन्मानासाठी तडजोड करणार नाही. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही ते म्हणाले.

 

अधिक वाचा :

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये फक्त ममताच राहतील ; नऊ आमदार, एक खासदार भाजपमध्ये 

संबंधित बातम्या