भारत-तालिबानमध्ये पहिली अधिकृत बैठक, 'या' विषयांवर झाली चर्चा

दीपक मित्तल (Deepak Mittal) यांनी मंगळवारी दोहा (Doha) येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट घेतली आहे
Ambassador of India to Qatar, Deepak Mittal, met Sher Mohammad Abbas Stanekzai in Doha
Ambassador of India to Qatar, Deepak Mittal, met Sher Mohammad Abbas Stanekzai in DohaTwitter

कतारमधील भारताचे राजदूत (India’s ambassador to Qatar) दीपक मित्तल (Deepak Mittal) यांनी मंगळवारी दोहा (Doha) येथे तालिबानच्या (Taliban) राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास (Sher Mohammad Abbas Stanekzai) स्टँकझाई यांची भेट घेतली आहे. त्यांची बैठकीचे प्रमुख कारण अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या जलद परतण्यावर केंद्रित होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.(Ambassador of India to Qatar, Deepak Mittal, met Sher Mohammad Abbas Stanekzai in Doha)

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राजदूत दीपक मित्तल यांनी भारताची जी चिंता आहे तीच चिंता या बैठकीत व्यक्त केली आहे. त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी अफगाणिस्तानची माती कोणत्याही प्रकारे वापरू नये.यावर उत्तर देताना तालिबानच्या प्रतिनिधीने राजदूताला आश्वासन दिले की हे सर्व मुद्दे सकारात्मकपणे सोडवले जातील. याव्यतिरिक्त, या सर्व अफगाण नागरिकांसाठी, विशेषत: अल्पसंख्यांक, ज्यांना भारतात प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांच्या बद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे समजत आहे.

तालिबान पक्षाच्या विनंतीनुसार दोहा येथील भारतीय दूतावासात ही बैठक झाली, असे निवेदनात म्हटले आहे. भारताने तालिबानशी औपचारिक संवाद सुरू केला आहे. दोन्ही देशांमधील ही पहिली अधिकृत बैठक आहे. विशेष म्हणजे कालच अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य त्यांच्या मायदेशी परतले होते आणि त्यानंतर लगेच ही बैठक पार पडली आहे.

Ambassador of India to Qatar, Deepak Mittal, met Sher Mohammad Abbas Stanekzai in Doha
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सरकारची 'पूर्ण नजर': संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

अमेरिकेच्या सैन्य वापसीनंतर तालिबान पॉलिटिकल ब्युरोचा सदस्य एनामुल्ला सामंगानी याने म्हटले आहे की, लोकांनी देश सोडून जाऊ नये आणि तालिबानसोबत देशाच्या विकासात सहभागी व्हावे. त्याचबरोबर आता आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याचेही त्याने सांगितले आहे.

तालिबान दहशतवादी संघटनेचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की तालिबानला भारतासोबत चांगले संबंध निर्माण करायचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com