Janet Yellen: अमेरिकेनेही केले मान्य; भारत जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था

अर्थमंत्री जेनेट येलेन भारत दौऱ्यावर, निर्मला सीतारामन यांची घेतली भेट
Janet Yellen
Janet YellenDainik Gomantak

Janet Yellen: भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असे मत अमेरिकेच्या अर्थ मंत्री जेनेट येलेन यांनी व्यक्त केले आहे. नोयडा येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. येलेन या अर्थमंत्री म्हणून प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत.

Janet Yellen
Twitter कंपनी दिवाळखोर होण्याची मस्क यांना भीती; अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे ट्विटरवर झाला परिणाम!

येलेन म्हणाल्या की, भारतात येऊन मला खूप आनंद झाला आहे कारण भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. शिवाय भारत जी-20 परिषदेच्या यजमानपदाची तयारी करत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटल्याप्रमाणे भारत अमेरिकेच्या महत्वाच्या भागीदारांपैकी एक आहे. भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपण कोरोना महारोगराईच्या परिणामांचा सामना करत आहोत आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे आलेल्या आर्थिक तंगीचाही सामना करत आहोत.

येलेन म्हणाल्या, भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. आशा आहे तो आणखी वाढेल. भारत संवादासाठी व्हॉटस्अॅपचा वापर करतो, अनेक अमेरिकन कंपन्या इन्फोसिसवर विसंबुन आहेत. भारतीय मूळ असलेले लोक गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहेत.

Janet Yellen
Nepal Election : नेपाळ निवडणुकीत 'ही' अभिनेत्री उतरणार रिंगणात; हिंदुत्ववादी पक्षाचा करणार प्रचार

आगामी काळात भारत आणि अमेरिका हेच मिळून जागतिक अर्थव्यवस्थेचा मार्ग ठरवणार आहेत. इंडिया पॅसिफिक क्षेत्राच्या समृद्धी आणि सुरक्षिततेसाठीही ही भागीदारी महत्वाची आहे.

जागतिक उर्जा संकटालावरून येलेन यांनी रशियावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, रशियाने खूप आधीपासूनच स्वतःला एक उर्जा पुरवठदार म्हणून प्रस्थापित केले आहे. पण आता ते स्वतःच्या स्वार्थासाठी इतर देशांच्या व्यापार बाधित करत आहेत.

दरम्यान, येलेन यांनी दिल्लीत होणाऱ्या युएस-इंडिया ईएफपी बैठकीपुर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com