American Airlines: धक्कादायक! फ्लाइटमध्ये पुन्हा लघुशंका, विमानतळावर नेमकं काय घडलं?

अमेरिकन एअरलाइन्समध्ये मद्यधुंद प्रवाशाने आपल्याच मित्रावर लघुशंका केल्याने विमानतळावरच अटक करण्यात आली आहे.
American Airlines
American AirlinesDainik Gomantak

American Airlines: न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने आपल्याच मित्रावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली. रिपोर्टनुसार, ही संपूर्ण घटना AA292 अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाईटमध्ये घडली आहे अशी माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी म्हणजेच 3 मार्च रोजी रात्री 9:16 वाजता न्यूयॉर्कहून विमानाने उड्डाण घेतले आणि 14 तास 26 मिनिटांनी शनिवारी 4 मार्चला रात्री 10:12 वाजता दिल्लीच्या IGI विमानतळावर उतरले. 

आरोपी हा अमेरिकेतील (America) एका विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याने मद्यधुंद अवस्थेत झोपेत लघुशंका केली होती. तो म्हणतो की त्याने हे जाणूनबुजून केले नाही. झोपेत लघुसंका बाहेर पडली आणि सहप्रवाशावर पडली, ज्याने क्रूकडे तक्रार केली.

  • आरोपीने माफी मागितली 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याने याबद्दल माफी मागितली आहे. त्यानंतर पीडित प्रवाशाने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, कारण यामुळे त्याचे करिअर खराब होऊ शकते. 

पण विमान कंपनीने ते गांभीर्याने घेत आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवले. एटीसीने सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना सतर्क केले, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • यापुर्वी देखील अशी घटना घडली

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली होती. एका मद्यधुंद पुरुषाने एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते नवी दिल्लीच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप केला होता. 

या घटनेनंतर सुमारे एक महिन्यानंतर मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. आता असेच आणखी एक प्रकरण समोर आल्यावर अमेरिकन एअरलाइन्सने ते गांभीर्याने घेतले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com