China सीमेवर भारताची मोठी तयारी, गेल्या 5 वर्षांत 15,000 कोटी केले खर्च

India-China Border: भारत-चीन सीमा भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच भारताने 2,088 किमीचे ऑल वेदर वाले रस्ते बांधले असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत सांगितले.
All Weather Roads
All Weather RoadsDainik Gomantak

India-China Border: भारत-चीन सीमा भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच भारताने 2,088 किमीचे ऑल वेदर वाले रस्ते बांधले असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, 2020 च्या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत भारत सीमावर्ती भागात कनेक्टिविटी सुधारत आहे. केंद्राने पुढे सांगितले की, 'गेल्या पाच वर्षांत LAC वर पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला गेला आहे.'

दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, ''सरकारने पाच वर्षांच्या कालावधीत भारत-चीन सीमेवर रस्ते प्रकल्पांवर 15,477 कोटी रुपये खर्च केले आहेत. भारताने चीन (China), पाकिस्तान (Pakistan), म्यानमार आणि बांगलादेशच्या (Bangladesh) सीमेवर ऑल वेदर वाले रस्ते बांधण्यासाठी 20,767 कोटी रुपये खर्च केले आहेत. भट्ट पुढे म्हणाले की, हे प्रकल्प बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने सुरु केले आहेत. यात भारत-पाकिस्तान सीमेवर 4,242 कोटी रुपये खर्चून 1,336 किमी रस्त्यांचा समावेश आहे.''

All Weather Roads
China: ड्रॅगनचा नेपाळला विळखा, सीमेवर वसवले गाव; भारताला दिला इशारा

दुसरीकडे, भारत आपल्या चीन सीमेजवळील भागात कनेक्टिव्हीटी सुधारण्यावर भर देत आहे. या व्यतिरिक्त, एलएसीवरील अडथळ्यांच्या दरम्यान लडाख सेक्टरमध्ये रस्ते, पूल आणि बोगदे यासह पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांनीही वेग घेतला आहे.

All Weather Roads
India-China Row: चीनी विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2022 पर्यंत चिनी सीमेवरील 61 मोक्याचे रस्ते पूर्ण करण्याची BRO ची योजना आहे. जेणेकरुन सैन्यांना पुढे जाण्यासाठी मदत होईल. तथापि, चीन LAC च्या बाजूने पायाभूत सुविधा देखील वाढवत आहे. पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये मे 2020 पासून भारत आणि चीन आमनेसामने आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com