Assam Election : ''काँग्रेस व एआययूडीएफ सत्तेत आल्यास राज्यातील घुसखोरी वाढेल''

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 मार्च 2021

अजमल यांच्या नेतृत्वातील अखिल भारतीय युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (एआययूडीएफ) काँग्रेसशी युती केली आहे. ही युती सत्तेत आल्यास आसाममध्ये घुसखोरी वाढेल. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एआययूडीएफ आणि काँग्रेसच्या राज्यातील युतीवर निशाणा साधला.

बद्रुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वातील अखिल भारतीय युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (एआययूडीएफ) काँग्रेसशी युती केली आहे. ही युती सत्तेत आल्यास आसाममध्ये घुसखोरी वाढेल. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एआययूडीएफ आणि काँग्रेसच्या राज्यातील युतीवर निशाणा साधला. आसाम मधील धेमाजी याठिकाणी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. यात 27 मार्चपासून सुरू होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. तर मतमोजणी 2 मे रोजी होईल. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये प्रचार सभांचा धुराळाही उडत आहे. अशातच अमित शहा यांनी आज आसाममध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की,"आम्ही विकासासाठी काम केले, तर काँग्रेस बद्रुद्दीन अजमलशी युती करणार आहे. राज्यात काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल सत्तेत आल्यास राज्यात घुसखोरी वाढेल. तुम्हाला घुसखोरी थांबवायची आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. तसेच, अजमलसमवेत एकत्र आल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाला लाज वाटली पाहिजे," असा टोलाही आणीत शहा यांनी यावेळेस लगावला. 

West Bengal Election : भाजपने जाहीर केले 'संकल्प' पत्र; सत्ता आल्यास...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत भाजपावर टीकास्त्र डागले होते. या टीकांना अमित शहा यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत बोलताना अमित शहा म्हणाले की,  "राहुल गांधी यांनी आसाम'च्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आवाहन केले परंतु मी राहुल गांधींना हे जाहीरपणे विचारतो की, काँग्रेस बदरुद्दीन अजमल यांच्या मांडीवर हे करणार आहे का?"  सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' असे भाजपाचे धोरण आहे. परंतु काँग्रेसचे मात्र राज्यांच्या विभाजनाचे धोरण आहे, असा आरोपही अमित शहा यांनी केला. 

दरम्यान, यापूर्वी भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीही काँग्रेसने राज्याच्या सुरक्षेला कधीही महत्त्व दिले नाही, असे सांगत काँग्रेसवर हल्ला चढविला होता. काँग्रेसने आसामच्या संस्कृतीला दुखावले आहे. काँग्रेसने कधीही आपल्या सुरक्षेला कधीही महत्त्व दिले नाही. म्हणूनच आसामच्या समस्या वाढतच आहेत, असे राजगड येथे सार्वजनिक सभेत बोलताना नड्डा म्हणाले होते.

संबंधित बातम्या