राहुल गांधी हे राजकीय पर्यटक; अमित शहा यांची बोचरी टीका 

दैनिक गोमन्तक
शनिवार, 3 एप्रिल 2021

भाजप-एनडीएला केरळ मधील मंदिराचे व्यवस्थापन हे नास्तिकांनी नव्हे तर भक्तांनी करावे, असे वाटत असल्याचे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. 

देशातील पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पॉंडिचेरी या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूक पुढील काही दिवसांमध्येच पार पडणार आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केरळमधील वायनाडमध्ये अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना, राहुल गांधी हे मागील 15 वर्षांपासून अमेठीचे खासदार होते व त्यांना अमेठीची सुधारणा करता आली नसून, आता ते वायनाडमध्ये आल्याचे सांगितले. (Amit Shah has criticized Rahul Gandhi in Wayanad Kerala) 

तसेच, अमित शहा यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना राहुल गांधी यांच्या सारखा राजकीय पर्यटक कधीही पहिला नसल्याचे म्हटले. शिवाय, सध्याच्या घडीला राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले असले तरी, ते वायनाड मध्ये पर्यटनासाठीच आले असल्याची बोचरी टीका अमित शहा यांनी केली आहे. याव्यतिरिक्त, राहुल गांधी हे वायनाडचे खासदार असेपर्यंत या क्षेत्राचा विकास होणार नसल्याचे अमित शहा यांनी पुढे बोलताना सांगितले. 

पश्चिम बंगालमधील अमित शहांच्या रोड शो नंतर सापडले बॉम्ब

यानंतर, केरळमधील शबरीमाला मंदिराबाबत बोलताना, भगवान अयप्पा यांच्या भक्तांवर लाठीमार केला जात असताना कॉंग्रेस शांत का होती, असा प्रश्न देखील अमित शहा यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला. इतकेच नाही तर, भाजप-एनडीएला केरळ मधील मंदिराचे व्यवस्थापन हे नास्तिकांनी नव्हे तर भक्तांनी करावे, असे वाटत असल्याचे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कोरोनाचा कहर: मृतदेहांचा अत्यंसस्कार करायला मिळेना जागा

याव्यतिरिक्त, केरळच्या एलडीएफ सरकारवर हल्ला करताना शहा म्हणाले की, राज्यात भाजप आणि आरएसएसच्या अनेक कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे भाजप कधीही कठोर परिश्रम करण्यास घाबरत नसून, केरळ मधील या परिस्थितीला घाबरणार नसल्याचे अमित शहा पुढे म्हणाले. एलडीएफ (LDF) आणि यूडीएफच्या (UDF) कारभारामुळे गेल्या दोन दशकांत केरळचा विकास झालेला नसल्याची तोफ अमित शहा यांनी डागली. तसेच, केरळ फक्त भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि राजकीय हिंसाचारात अडकलेला असल्याचे ते म्हणाले. 

त्याचबरोबर अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा उल्लेख करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळसाठी (FAST) फास्टचे दृष्टीकोन ठेवले असल्याचे नमूद केले. ज्यामध्ये एफ म्हणजे मत्स्यपालन व खत, ए म्हणजे शेती व आयुर्वेद, एस म्हणजे कौशल्य विकास आणि सामाजिक सशक्तीकरण व टी म्हणजे राज्याचे पर्यटन व तंत्रज्ञानाद्वारे विकास असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.      

संबंधित बातम्या