अमित शहांचा जम्मू-काश्मीर दौरा,ड्रोनपासून इंटरनेट बंदीपर्यंत घाटीला अभेद्य किल्ल्याचे रूप
Amit Shah in Jammu-Kashmir Indian Army on high alert Dainik Gomantak

अमित शहांचा जम्मू-काश्मीर दौरा,ड्रोनपासून इंटरनेट बंदीपर्यंत घाटीला अभेद्य किल्ल्याचे रूप

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आजपासून 3 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जात आहेत.

जम्मू-काश्मीरमधून (Jammu-Kashmir) कलम 370 (Article 370) आणि 35 ए हटवल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आजपासून 3 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्र्यांच्या (Home Minister) भेटीसाठी संपूर्ण काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.या पार्शवभूमीवर घाटीत अभेद्य सुरक्षा ठेवण्यात आली आहे.आयबी (IB), एनआयए (NIA), आर्मी, सीआरपीएफचे (CRPF) वरिष्ठ अधिकारी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. जे प्रत्येक गुप्तचर माहितीवर लक्ष ठेवत आहेत. (Amit Shah in Jammu-Kashmir Indian Army on high alert)

या भेटीत गृहमंत्री शहा काश्मीरच्या सर्व राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांसह स्थानिक सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांना भेटतील आणि काश्मीरच्या विकासावर चर्चा करतील.

मागील काही दिवसांपासून घाटीतील हिंसाचार आणि दहशतवादी कारवायांमुळे अगोदरच संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. अल्पसंख्यांक आणि स्थलांतरितांच्या हत्येनंतर 12 वर्षांनंतर पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात दहशतवाद्यांविरोधातील सैन्याची सर्वात मोठी कारवाई सुरू आहे.आणि अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.त्यामुळे त्या साऱ्या भागात सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमित शहा आज सकाळी जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरला पोहोचतील. श्रीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचा ते आढावा घेतील . 23 ऑक्टोबरला दिवसभर गृहमंत्री अमित शाह जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल, आयबी अधिकारी, सीआरपीएफ आणि एनआयएचे डीजी, लष्कर अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी यांची बैठकघेणार आहेत . 23 ऑक्टोबर रोजीच नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत ते एकात्मिक मुख्यालयाच्या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचा देखील आढावा घेतील.

Amit Shah in Jammu-Kashmir Indian Army on high alert
"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास " याचं जिवंत उदाहरण म्हणजे लसीकरण: पंतप्रधान

त्याच दिवशी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर म्हणजेच SKICC येथे पंचायत प्रतिनिधी आणि केंद्रीय योजनांचे लाभार्थी 370 काढून टाकल्यानंतर विकास कामांचा अभिप्राय घेतील. 24 ऑक्टोबर रोजी गृहमंत्री जम्मूच्या आयआयटीमध्ये नवीन ब्लॉकचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर ते जम्मूमध्ये जाहीर सभेला देखील संबोधितकरणार आहेत.

खोऱ्यातील आयएसआयच्या नापाक कारस्थानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमित शहा यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आणि हे लक्षात घेऊन संपूर्ण श्रीनगरमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहराचे किल्ल्यात रूपांतर झाले आहे.गृहमंत्र्यांच्या या दौऱ्यावेळी जमिनीपासून आकशापर्यंत पाळत ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर श्रीनगरमधील लाल चौकात सखोल तपास सुरू आहे. तर CRPF च्या 132 बटालियन आणि क्विक ऍक्शन टीमच्या महिला कमांडो देखील चेकिंग करत आहेत.

श्रीनगरमध्ये सर्वत्र सुरक्षा दलाच्या तैनातीबरोबरच हायटेक ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे. अल्पसंख्यांकांच्या वस्तीत देखील ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. हायटेक ड्रोनशिवाय स्नायपर्सच्या माध्यमातूनही पाळत ठेवली जात आहे. श्रीनगर आणि पुलवामाच्या जवळपास 15 भागात मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दाल लेकचा परिसर सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com