अमित शहांची ‘विश्‍वभारती’ला भेट देऊन रवींद्रनाथ टागोरांना आदरांजली

वृत्तसंस्था
सोमवार, 21 डिसेंबर 2020

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्‍वभारती विद्यापीठाला भेट देत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहिली. टागोरांनी शांतिनिकेतनला सांस्कृतिक केंद्र बनविले, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. 

शांतिनिकेतन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्‍वभारती विद्यापीठाला भेट देत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहिली. टागोरांनी शांतिनिकेतनला सांस्कृतिक केंद्र बनविले, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. 

विश्‍वभारती विद्यापीठाच्या परिसरात अमित शहा सुमारे दोन तास होते. ते म्हणाले की,‘‘गुरुदेव टागोरांनी केवळ भारतीय तत्वज्ञान आणि साहित्यातच भर घातली नाही तर, भारतीय संस्कृतीला इतर देशांच्या संस्कृतींशी जोडण्याचे केंद्र म्हणून शांतिनिकेतनचा विकास केला. मनाचा संकुचितपणा दूर होऊन सत्याचे ज्ञान होणे, हा शिक्षणाचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.  टागोरांचे स्वातंत्र्य चळवळीतही मोठे योगदान होते. आपल्या देशात दोन प्रकारचे राष्ट्रवाद होते आणि महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे अर्ध्वयू होते. विशेष म्हणजे, दोघांना टागोरांपासूनच स्फुर्ती मिळाली होती. टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाल्याने त्यांचा मान वाढला नाही, तर यामुळे नोबेल पुरस्काराचाच मान वाढला.’’ 

 

अधिक वाचा :

पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतं दिली, तर रक्ताचे पाट वाहतील

ममता बॅनर्जींचं सरकार भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचारात क्रमांक एकवर

भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत, त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्या

संबंधित बातम्या