अमित शहा पुन्हा ‘एम्स’मध्ये भरती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

गृहमंत्री अमित शहा यांना काल रात्री अकराच्या सुमारास ‘एम्स’मध्ये नेण्यात आले. कोरोना संक्रमणामुळे त्यांना उपचारासाठी २ ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल केले होते.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काल रात्री उशिरा ‘एम्स’ (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना संक्रमणाच्या शक्यतेमुळे शहा यांना याआधी ‘एम्स’मध्ये भरती व्हावे लागले होते. 

संसद अधिवेशनापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना भरती केल्याचे ‘एम्स’ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांना काल रात्री अकराच्या सुमारास ‘एम्स’मध्ये नेण्यात आले. कोरोना संक्रमणामुळे त्यांना उपचारासाठी २ ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांनंतर त्यांना १४ ऑगस्टला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर १८ ऑगस्टला अमित शहा यांना थकवा आणि अंगदुखी जाणवू लागल्यानंतर पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल केले होते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या