''कोरोनाची लसीकरण मोहीम संपल्यानंतर देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार'' 

''कोरोनाची लसीकरण मोहीम संपल्यानंतर देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार'' 
Copy of Gomantak Banner - 2021-02-11T214028.667.jpg

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील कोरोनाची लसीकरण मोहीम संपल्यानंतर पश्चिम बंगालमधील मातुआ समुदायासह अन्य शरणार्थ्यांना सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधकांनी अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल केल्याचा आरोप अमित शहा यांनी करत, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीचा भारतीय अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल मधील ठाकूरनगर येथे झालेल्या रॅलीत सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी कोरोनाच्या लसीकरण मोहिमेनंतर करण्यात येणार असल्याचे सांगितले. व या कायद्याच्या आधारे राज्यातील मातुआ समुदायासह अन्य शरणार्थ्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. तसेच 2018 मध्ये मोदी सरकारने देशभरात नवीन नागरिकत्व कायदा आणणार असल्याचे आश्वासन दिले होते. आणि त्यानुसार 2019 मध्ये भाजपाची सत्ता येताच हे आश्वासन पूर्ण करण्यात आल्याचे अधोरेखित करत सरकारने हा कायदा केल्याचे अमित शहा यांनी सांगितले. मात्र 2019 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे हा कायदा लागू करण्यात आला नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

यानंतर, अमित शहा यांनी यावेळेस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला मोर्चा वळवत टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाने चुकीचे वचन दिले असल्याचे म्हणत, हा  सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात कधीही लागू करणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र भाजपाने हा कायदा केला असून, तो लागू देखील करणार असल्याचे अमित शहा यांनी रॅलीत बोलताना सांगितले. तसेच राज्यात हा कायदा अमलात आणून याद्वारे शरणार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत नागरिकत्व देणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांचा सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दलचा विरोध मावळणार असल्याचे सांगून, त्या राज्याच्या मुख्यमंत्रीच राहणार नसल्याचे अमित शहा म्हणाले. 

दरम्यान, मातुआ समुदाया हा पूर्व पाकिस्तानमधील हिंदू आहेत. आणि ते फाळणीनंतर आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर भारतात आले. मातुआ समुदायातील काही जणांना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. तर अधिक जणांना देशाचे नागरिकत्व मिळाले नसून, ते शरणार्थीच म्हणून आपले वास्तव्य करत आहेत.     

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com