Chattisgarh Naxal Attack: "जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही"

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

शनिवारी झालेल्या या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तब्बल 22 जवानांना वीरमरण आले असल्याचे समजते आहे.

छत्तीसगडच्या बीजापूर या नक्षलग्रस्त भागातील एका गावाजवळ काल नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणेच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली होती. शनिवारी झालेल्या या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तब्बल 22 जवानांना वीरमरण आले असल्याचे समजते आहे. या घटनेबद्दल बोलताना 'शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही' अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.  (Amit shah Said The sacrifices of the soldiers will not go in vain)
 
पाच राज्यांत सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे सध्या प्रचार दौरे सुरु आहेत. मात्र काल छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या गंभीर घटनेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा हे रविवारी तातडीने दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या या घटनेत शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहताना अमित शाह यांनी शहिद जवानांच्या कटुंबीयांना आश्वासन दिले की, "नक्षलवाद्यांशी लढताना शहिद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही." तसेच या घटनेत बेपत्ता झालेल्या जवानांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी अमित शाह (Amit Shah) यांच्या आदेशावरून सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह हे छत्तीसगड मधील घटनास्थळावर पोहोचल्याचे समजते आहे.

छत्तीसगडचे (Chattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील या गंभीर प्रकरणानंतर आसाम मधील प्रचार दौरा सोडून आज सायंकाळपर्यँत छत्तीसगड मध्ये परतणार असल्याची माहिती मिळते आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीवरून छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त (NAxal) भागातील बीजापूर गावाजवळ झालेल्या या घटनेत 22 जवान शहिद झाले असून, 31 जवान गंभीर जखमी झाले असल्याचे समजते आहे.  

संबंधित बातम्या