Amit Shah: शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, TRS नेत्याने ताफ्यासमोर लावली गाडी

Amit Shah's Hyderabad Visit: हैदराबादमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आली.
TRS Leader
TRS LeaderDainik Gomantak

Amit Shah's Hyderabad Visit: हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आली आहे. टीआरएस नेते श्रीनिवास यांनी शहांच्या ताफ्यासमोर कार उभी केली. त्यानंतर तात्काळ सुरक्षा कर्मचार्‍यांनी टीआरएस नेते श्रीनिवास यांची कार हटवली. मात्र, आता टीआरएस नेते श्रीनिवास यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. श्रीनिवास म्हणाले की, 'मी टेन्शनमध्ये होतो. गाडी त्यांच्या ताफ्यासमोर थांबली होती.' पोलिसांनी टीआरएस नेते श्रीनिवास यांना ताब्यात घेतले आहे.

अमित शहांच्या ताफ्यासमोर कार उभी

टीआरएस नेते श्रीनिवास यांनी हैदराबादमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यासमोर कार उभी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तात्काळ सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांची कार गृहमंत्री अमित शहांच्या ताफ्यासमोरुन हटवली.

TRS Leader
Amit Shah Mumbai Tour: गृहमंत्री शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सूरक्षा यत्रंणेचे दूर्लक्ष

टीआरएस नेत्याने हे कारण सांगितले

टीआरएस नेते श्रीनिवास यांनी सांगितले की, 'मी तणावाखाली होतो. मी पोलिस (Police) अधिकाऱ्याशी बोलेन. त्यांनी कारची तोडफोड केली आहे.'

TRS Leader
Amit Shah वर वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी फिल्ममेकर अविनाश दास गजाआड

'हैदराबाद लिबरेशन डे'वर शाह काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हैदराबाद दौऱ्यावर आहेत. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना शहा म्हणाले की, 'जर सरदार पटेल नसते तर हैदराबाद (Hyderabad) मुक्त व्हायला अजून बरीच वर्षे लागली असती. निजामाच्या रझाकारांचा पराभव झाल्याशिवाय अखंड भारताचे स्वप्न साकार होणार नाही, हे सरदार पटेलांना माहीत होते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com