कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे पंजाबमधील रेल्वे सेवा विस्कळीत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे पंजाबमधील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. ​

चंदीगढ : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे पंजाबमधील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. मालगाड्यांची सेवा सुरळीत व सुरक्षित सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मालगाड्या व प्रवासी गाड्या अशा दोन्ही सेवा सुरू राहतील किंवा कोणतीच नाही, असा निर्णय रेल्वेने शनिवारी घेतला. 24 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वेने पंजाबमधील सेवा स्थगित केली आहे. 21 ऑक्टोबर रोजी मालगाड्या सोडण्यात आल्या, पण शेतकऱ्यांनी त्या अडवल्या.

अमरिंदर यांनी सांगितले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या नाही. सर्व रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यात आले असून तेथे शेतकऱ्यांच्या कोणत्याही हालचाली होत नाहीत. पंजाब तसेच शेजारच्या राज्यांतील पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नुकसान होत 
आहे.

संबंधित बातम्या