Congress Protest: काळे कपडे घालून आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर शहांनी साधला निशाणा

Amit Shah On Congress Protest: देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसने आज निदर्शने केली.
Amit Shah
Amit Shah Dainik Gomanatk

Amit Shah On Congress Protest: देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसने आज निदर्शने केली. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी आता गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शहा म्हणाले की, 'मला विश्वास आहे की, एक जबाबदार पक्ष असल्याने ते कायद्याचे पालन करतील.'

शहा म्हणाले की, आत्तापर्यंत दररोज सामान्य कपड्यांमध्ये आंदोलन केले जात होते. आज मात्र काळ्या कपड्यात आंदोलन का झाले? ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेस (Congress) प्रदीर्घ काळ सत्तेत होती, परंतु राम मंदिराचा वाद मिटला नाही. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी या दिवशी अयोध्येत (Ayodhya) राम मंदिराची पायाभरणी करुन 500 वर्षांचा वाद संपुष्टात आणला.'

Amit Shah
Congress Protest: 'या' कॉंग्रेस नेत्यांचा काळे कपडे घालून विरोध

तुष्टीकरणाचे धोरण ना देशासाठी चांगले आहे ना काँग्रेससाठी

शाह पुढे असेही म्हणाले की, अनेक ठिकाणी पराभव करुनही ते तुष्टीकरण सोडत नाहीयेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून काँग्रेसने गुप्तपणे तुष्टीकरणाचा अजेंडा पुढे नेला आहे. मला इथे आवर्जून सांगायचे आहे की, तुष्टीकरणाचे धोरण ना देशासाठी चांगले आहे ना काँग्रेससाठी. त्याचबरोबर ईडीच्या (ED) कारवाईवर शाह म्हणाले की, 'प्रत्येकाने कायद्याचा पूर्ण आदर केला पाहिजे.'

Amit Shah
Congress Protest: "70 वर्षांची लोकशाही 8 वर्षात संपली": राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लोबल

काँग्रेसने आंदोलन केले

आज काँग्रेस नेत्यांनी महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि बेरोजगारीविरोधात काळे कपडे परिधान करुन निदर्शने केली. निदर्शनादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तब्बल 6 तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com