बंगाल निवडणुकीबद्दल अमित शाह यांचा मोठा दावा 
amit shah.jpg

बंगाल निवडणुकीबद्दल अमित शाह यांचा मोठा दावा 

पश्चिम बंगाल, आसाम सध्या विधानसभा निवडणूक सुरु असून, या निवडणुकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या राज्यांत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळणार, असा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी केला आहे. शनिवारी पश्चिम बंगाल मध्ये पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान झाले असून, आसाम मध्ये 47 जागांसाठी मतदान झाले आहे. तर, पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन्हीही राज्यात भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. (Amit Shahs big claim about West Bengal and Assam elections)       

शनिवारी 27 मार्च रोजी दोन्ही राज्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या 30 पैकी 26 जागा आणि आसामच्या 47 पैकी  37 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर 200 हून अधिक जागा मिळवून पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल. तसेच, आसाममध्येही भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने विजयी होईल असा विश्वास असल्याचे सांगितले. शनिवारी 27 मार्च रोजी दोन्ही राज्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या, याच पार्श्वभूमीवर बोलत असताना अमित  शाह  म्हणाले की, "पश्चिम बंगाल आणि आसामच्या मतदानाचा पहिला टप्पा काल झाला. आम्हाला मतदान केल्याबद्दल मी दोन्ही राज्यातील जनतेचे आभार मानू इच्छितो. तसेच पश्चिम बंगालमध्ये 84 टक्क्यांहून अधिक मतदान आणि आसाममधील 79 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानातून लोकांचा उत्साह दिसून येते." 

मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे एकही मृत्यू झाला नाही, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि आसाम (assam) या दोन्ही राज्यांत लोकांनी शांततेत मतदान केले. काही वर्षांपूर्वी आसाम मध्ये निवडणूकी दरम्यान मोठा हिंसाचार होत असत, तसेच बंगालही हिंसाचाराच्या घटनांसाठी ओळखला जात होता. मात्र, दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले असल्याचे मत अमित शाह यांनी व्यक्त केले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com