
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी बर्फाची चादर साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गंदरबल जिल्ह्यातील जोजिला येथील बालटालजवळ गुरुवारी हिमस्खलन झाले. या हिमवादळामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी गंदरबल भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी घराएवढ्या आकाराचे बर्फाचे ढिगारे दिसत होते. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) बराच वेळ बर्फवृष्टी झाली.
काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे. श्रीनगरमधील तापमान शून्य अंशाच्या जवळ पोहोचले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये उणे 3.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बारामुल्ला येथे किमान तापमान उणे 4.4 अंश सेल्सिअस होते. खोऱ्यात कुठेही 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर आता पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात 24 तासांत मुसळधार बर्फवृष्टी होऊ शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. तसेच, अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. 12 आणि 13 जानेवारी रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे जम्मूमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. लडाखला काश्मीर खोऱ्याशी जोडणाऱ्या श्रीनगर-लेह महामार्गावर अनेक ठिकाणी हिमस्खलन झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, जवानांनी काही वेळातच बर्फ हटवला आणि त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. झोजिला मार्ग 07 जानेवारीपासून बंद आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.