Kerala: पलक्कडमध्ये RSS कार्यकर्त्याची हत्या, बाईकवरुन आले होते हल्लेखोर

केरळमधील पलक्कमध्ये शनिवारी एका RSS कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.
RSS Worker
RSS WorkerDainik Gomantak

केरळमधील पलक्कमध्ये शनिवारी एका RSS कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. पलक्कड पोलिसांनी सांगितले की, दुचाकीवरुन आलेल्या एका गटाने दुकानात जाऊन आरएसएसचे माजी शारिक शिक्षण प्रमुख श्रीनिवासन (Srinivasan) यांची हत्या केली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नेत्याच्या हत्येच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. शुक्रवारी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India) स्थानिक नेत्याची त्याच्या वडिलांसमोरच हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील एलापुल्ली परिसरात दुपारी सुबैर यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना वाचवता आले नाही. (An RSS worker was killed in Palakkad Kerala)

पोलिसांनी सांगितले की, पीएफआयच्या पॅरा रिजनल कमिटीचे अध्यक्ष सुबैर हे आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरुन जात असताना त्यांना कारने धडक दिली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर सुबैर यांच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाल्याचा आरोप आहे. मशिदीत नमाज अदा करुन घरी परतत असताना ही घटना घडली.

RSS Worker
बारामुल्लात दहशतवाद्यांनी सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या

'सुबैरच्या वडिलांनी RSS सदस्यांशी वैर असल्याचं वक्तव्य केलं होतं'

जिल्ह्यातील उच्च पोलिस अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, पलक्कडचे पोलिस अधीक्षक आर विश्वनाथ यांनी सांगितले की, 'सुबैरच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांशी असलेल्या वैराबद्दल वक्तव्य केले आहे.' ते म्हणाले की, ''पीएफआय कार्यकर्त्याच्या हत्येनंतर त्याचा बदला म्हणून जिल्ह्यात आणखी हल्ले होऊ नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.' मलमपुझामधील सत्ताधारी सीपीआय ( M) आमदार प्रभाकरन यांनी सुबैर यांच्या हत्येचा निषेध केला आणि विशूच्या दिवशी केलेले अमानुष कृत्य असल्याचे म्हटले.

दरम्यान, सुबैर यांच्या दुचाकीला धडक देण्यासाठी वापरलेली बेवारस कार पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर दुसऱ्या कारमधून पळून गेले. काही महिन्यांपूर्वी, 27 वर्षीय आरएसएस कार्यकर्ता, एस संजीत यांची याच भागात पीएफआयची राजकीय शाखा, एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी कथितपणे हत्या केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संजीतची पत्नीसमोरच हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही बेवारस कार संजीतच्या नावावर नोंदवण्यात आली होती. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

RSS Worker
ट्रॅफिक पोलिसाने ड्युटी सांभाळत दिले बेघर मुलाला शिक्षणाचे धडे

याशिवाय, हा खून राजकीय हेतूने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, सुबैर यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप पीएफआयने केला आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. एका निवेदनात पीएफआयने आरोप केला आहे की, ''सुबैरच्या हत्येसाठी उच्चस्तरीय कट रचण्यात आला होता. पलक्कड जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने पीएफआय कामगार जमा झाले, जिथे सुबैरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ठेवण्यात आला आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com