याकाळात ट्विटरवर येण्याचा विचार सुद्धा करू नका: आनंद महिंद्रा

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

आनंद महिंद्रा यांनी नुकतेच केलेले एक ट्विट देखील चर्चेत आल्याचे पाहायला मिळते आहे.

देशातले प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. ट्विटच्या माध्यमातून आनंद महिंद्रा नेहमीच समकालीन परिस्थितीवर भाष्य करत असतात . विशेष म्हणजे त्यांचे ट्विट लोकांना देखील आवडत असल्याचे पाहायला मिळते. आनंद महिंद्रा यांनी नुकतेच केलेले एक ट्विट देखील चर्चेत आल्याचे पाहायला मिळते आहे. (Anand mahindra said Don't even think of coming to Twitter this time)

"निवडणूका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात"; हे काय नियोजन आहे का?
 
'मला तो काळ आठवतो आहे ज्या काळात आपण कुणालाही न दुखावता आपल मत मांडू शकत होतो' अशा आशयाचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केला आहे. तसेच आनंद महिंद्रा यांनी या परिस्थितीमध्ये ट्विटरवर सक्रिय होण्याबद्दल विचार सुद्धा करू नये असा सल्ला सोशल मीडिया वापरकर्त्यांना दिला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यानी यापासून दूर राहिले पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे दिसून येते आहे. या ट्विट सोबत त्यांनी टॉम अँड जेरी मधील जेरी या पात्राचा फोटो ट्विट केला आहे. 

दरम्यान, ट्विटरवर होणाऱ्या वेगवगेळ्या हालचाली सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच नियमांचे उल्लंघन केल्यामुले ट्विटरने अभिनेत्री कंगना  रनौतचे ट्विटर अकाउंट काही दिवसांसाठी सस्पेंड केले आहे. मात्र आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटचा रोख नेमका कुणाकडे होता हे स्पष्ट होऊ शकले नाही. 

संबंधित बातम्या