या टॅलेंटचं कौतुक करावं का? आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावरील ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट करत, त्या सोबतच आपले विचार देखील मांडतात.

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावरील ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट करत, त्या सोबतच आपले विचार देखील मांडतात. तसेच भारतातील अनेक मजेदार गोष्टींवर देखील आनंद महिंद्रा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. आणि यावेळी देखील आनंद महिंद्रा अशाच प्रकारची पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी मुंबईतील एक मजेदार फोटो ट्विटरवर शेअर केला असून, या फोटोवर त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. 

मागील काही दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. आणि यासंदर्भातीलच एका जुगाडाचा फोटो आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला असून, हा जुगाड प्रशंसेच्या लायक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय त्यांनी केलेली ही पोस्ट कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून जागरूकता देखील निर्माण करणारी आहे. 

टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवर मुंबईतील लोकल मध्ये प्रवास करत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती लोकल मध्ये झोपला असल्याचे दिसत आहे. आणि त्याने कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून मास्क देखील घातला आहे. मात्र त्याचा हा मास्क तोंडावर नसून तो डोळ्यावर लावलेला आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी फोटोला कॅप्शन देताना, मुंबईतील गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या वाढलेल्या कारणांचा तपास कराल, असे लिहिले आहे. व यासोबतच कंसात आनंद महिंद्रा यांनी, झोपण्यासाठी म्हणून करण्यात आलेला जुगाड प्रशंसा करण्याच्या बरोबरीचा नसल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनाचे वाढते रुग्ण महाराष्ट्रात आणि केरळ मध्ये आढळून येत आहेत. तर, महाराष्ट्रात काही दिवसांपासून दिवसाला सापडणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 5,000 च्या पुढे गेला आहे. व त्यासाठी प्रशासनाने देखील पावले उचलत काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन तर काही ठिकाणी निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.             

 

संबंधित बातम्या