अंत्यसंस्कार केलेली महिला 15 दिवसांनी घरी पोहोचली अन सगळेच घाबरले

दैनिक गोमंतक
गुरुवार, 3 जून 2021

रुग्णालय प्रशासनाने मुत्याला गिरिजम्मा यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देखील दिले.

एखादी मृत व्यक्ती जिवंत झाली असल्याचं आपण पहिलय का? जर खरच असं घडलं तर अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) कृष्णा जिल्ह्यात (Krushna District) एक अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत एका 75 वर्षीय महिला मुत्याला गिरिजम्मा याना रुग्णालयाने मृत घोषित केले होते, त्यानंतर गिरिजम्मा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र त्यानंतर काही दिवसानंतर गिरिजम्मा या स्वतः घरी पोहोचल्यानंतर कुटुंबियांचे धाबे दणाणले. (In Andhra Pradesh the dead woman reached home after 15 days)

कोरोना विषाणूची (Covid-19) बाधा झालेल्या गिरिजम्मा यांच्यावर रुग्णालयात होते. त्यातच रुग्णालय प्रशासनाने गिरिजम्मा यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृत्यू झाल्याचे कळवले. त्यांनतर कुटुंबीयांनी शवागृहातून एक मृतदेह घेऊन गिरिजम्मा यांचा मृतदेह समजून त्यावर अंत्यसंस्कार देखील केले. मात्र हे सगळं घडून गेल्यावर 15 दिवसांनी गिरिजम्मा या घरी पोहोचल्या आणि सगळेच घाबरले. या प्रकरणी गिरिजम्मा यांचा पुतण्या नागू यांनी दिलेल्या माहिती नुसार,"माझे काका शवगृहात गेले आणि गिरिजम्मा यांच्या सारखाच एक मृतदेह घेऊन आले. विजयवाडा रुग्णालय प्रशासनाने मृत्यू प्रमाणपत्र देखील दिले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते."  

आजारी मुलाच्या इच्छामरणासाठी आईची न्यायालयात याचीका, दोन तासांतच झाला मुलाचा...

मात्र कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांनी गिरिजम्मा या घरी पोहोचल्या तेव्हा लक्षात आले की, अंत्यसंस्कार केलेला तो मृतदेह गिरिजम्मा यांचा नव्हताच. दरम्यान गिरिजम्मा या अचानक घरी आल्याने कुटुंबीय तसेच त्यांच्या शेजाऱ्यांना मात्र आश्चर्याचा मोठा धक्का बसला. 

संबंधित बातम्या