पशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करणार

Pib
गुरुवार, 25 जून 2020

म्यानमारमधल्या श्वे तेल आणि वायू प्रकल्पाच्या अधिक विकासासाठी ओव्हीएल कडून 121.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे 909 कोटी रुपये) अतिरिक्त गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने  मंजुरी दिली.

 नवी दिल्ली, 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 जूनला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामुळे विविध क्षेत्रातल्या पायाभूत संरचनेला आवश्यक चालना  मिळणार असून महामारीच्या काळात ही चालना अतिशय महत्वाची आहे.

 1)पशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करणार:

पूर्वपीठीका-

नुकत्याच जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत  अभियान प्रोत्साहन पॅकेजनुसार15,000 कोटी रुपयांचा पशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळाने आज मंजुरी दिली.

दुग्धव्यवसाय पायाभूत संरचना विकसित करण्यासाठी, सहकारी क्षेत्राकडून गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, केंद्र सरकारने याआधी10,000 कोटी रुपयांच्या  दुग्धव्यवसाय पायाभूत विकास निधीला मंजुरी दिली आहे. तथापि पशु पालन क्षेत्रात प्रक्रिया आणि मूल्यवर्धन तसेच पायाभूत क्षेत्रात एमएसएमई आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचीही  आवश्यकता होती.

आज मंजूर झालेल्या पशुपालन पायाभूत विकास निधीमुळे, दुग्ध, मांस प्रक्रिया आणि पशु खाद्य कारखान्यात पायाभूत गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेक्शन 8 कंपन्या, खाजगी कंपन्या आणि वैयक्तिक उद्योजक राहणार असून गुंतवणूकीत त्यांचे केवळ 10 टक्के योगदान राहील. उर्वरित 90 टक्के रक्कम  त्यांना शेड्यूल बँका कर्ज रूपाने उपलब्ध करून देतील. पात्र लाभार्थींना केंद्र सरकार व्याज दरात 3 टक्के सवलत  देईल.कर्जासाठी  2 वर्षाच्या अधिस्थगन काळासह परतफेडीसाठी 6 वर्षाचा काळ उपलब्ध राहील.

यासाठी केंद्र सरकार 750  कोटीं रुपयांचा पत हमी निधी स्थापन करणार असून नाबार्ड त्याचे व्यवस्थापन करणार आहे. एमएसएमईच्या व्याख्येच्या मर्यादेत येणाऱ्या प्रकल्पांना  याअंतर्गत पत हमी देण्यात येणार आहे. कर्जदाराच्या पत सुविधेच्या 25 टक्के पर्यंत हमी छत्र राहील.

 लाभ-

पशु पालन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रचंड वाव आहे. पशुपालन पायाभूत विकास निधीसह खाजगी गुंतवणूकदारांसाठी व्याजदरात सवलत योजनेमुळे या प्रकल्पांना आवश्यक भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित होण्याबरोबरच गुंतवणुकदाराना वाढीव परतावा मिळण्यासाठी मदत होणार आहे.  प्रक्रिया आणि पायाभूत मूल्य वर्धनामुळे निर्यातीलाही प्रोत्साहन मिळणार आहे.

या क्षेत्राच्या विकासामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट लक्षणीय सकारात्मक परिणाम होईल. अशाप्रकारे पशुपालन पायाभूत विकास निधीमार्फत 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे खाजगी गुंतवणूक अनेक पटींनी येण्याबरोबरच शेतकऱ्यानाही अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार आहे, त्यातून उत्पादकता वाढून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्याला मदत होणार आहे. या निधी मार्फत मंजूर झालेल्या उपाययोजनामुळे सुमारे  35 लाख व्यक्तीसाठी थेट आणि अप्रत्यक्ष उपजीविका निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. 

 2. उत्तर प्रदेशातला कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर:

पूर्वपीठीका-

कुशीनगर हे महत्वाचे बौद्ध धर्मस्थळ असून इथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते.हे अतिशय पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून जगभरातले बौद्ध भाविक इथे भेट देतात. कुशीनगरच्या आजूबाजूच्या परिसरात श्रावस्ती (238 किमी), कपिलवस्तू (190 किमी), लुम्बिनी (195 किमी) ही आणखी बौद्ध स्थळे असून  तीही अनुयायी आणि पर्यटकानाही आकर्षित करतात. भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बौद्ध यात्रा मंडलात कुशीनगरचा आधीपासूनच समावेश आहे. उत्तर प्रदेशातला कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

 लाभ-

बौद्ध यात्रा मंडल हे जगभरातल्या 530 दशलक्ष बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या लोकांसाठी महत्वाचे यात्रा स्थान आहे. कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर केल्यामुळे कनेक्टीविटी सुधारण्या बरोबरच हवाई प्रवाश्यांना स्पर्धात्मक दराने सेवेचे विस्तृत पर्याय उपलब्ध होतील त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला आणि या भागातल्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल.

कुशीनगर इथे थायलंड, कंबोडिया, जपान, म्यानमार इथले  200-300 भाविक प्रार्थनेसाठी दिवसाला भेट येतात. मात्र या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाला थेट कनेक्टीविटी नव्हती त्यामुळे त्यांची ही अनेक दिवसांची मागणी  प्रलंबित होती.

कुशीनगरला थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टीविटी मिळाल्याने विदेशी आणि देशातल्या पर्यटकांची संख्याही वाढेल आणिया भागाच्या  आर्थिक विकासाला चालना मिळेल. देशातल्या वाढत्या पर्यटन आणि आतिथ्यशिलतेला या आंतरराष्ट्रीय विमान तळामुळे आणखी चालना मिळणार आहे.

 3. म्यानमारमधल्या श्वे तेल आणि वायू प्रकल्पाच्या अधिक विकासासाठी ओव्हीएल कडून अतिरिक्त गुंतवणुकीला मंजुरी:

पूर्वपीठीका-

ओएनजीसी विदेश (ओव्हीएल), 2002 पासून म्यानमारमधल्या श्वे वायू प्रकल्पात शोध आणि विकासाशी,  दक्षिण कोरिया, भारत आणि म्यानमारमधल्या कंपन्यांच्या संघाचा भाग म्हणून निगडीत आहे. गेल हा भारतातला सार्वजनिक उपक्रमही या प्रकल्पात सह गुंतवणुकदार आहे. ओव्हीएलने, 31 मार्च 2019 पर्यंत या प्रकल्पात  722 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची (सुमारे 3949 रुपये, सरासरी वार्षिक विनिमय दरानुसार) गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून जुलै 2013 ला  पहिला गॅस प्राप्त झाला. 2014-15 या वित्तीय वर्षापासून हा प्रकल्प सकारात्मक रोकड प्रवाह निर्माण करत आहे. 

 लाभ-

शेजारी राष्ट्राच्या तेल आणि वायू शोध आणि विकास प्रकल्पातभारतीय पीएसयु द्वारे गुंतवणूकही भारताच्या अॅक्ट इस्ट पॉलिसीला अनुसरून करण्यात आली आहे. त्याच बरोबर भारताची उर्जा सुरक्षितता बळकट करण्याबरोबरच शेजारी राष्ट्राशी उर्जा समन्वय विकसित करण्याच्या भारताच्या धोरणाचा तो एक भाग आहे.

 

संबंधित बातम्या