या विमानतळावर संस्कृतमधून दिल्या जातायेत सूचना, ऐकून प्रवासी मंत्रमुग्ध; पाहा Video

बनारस हिंदू विद्यापीठा (BHU) च्या सहकार्याने भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने हा उपक्रम सुरु केला आहे.
या विमानतळावर संस्कृतमधून दिल्या जातायेत सूचना, ऐकून प्रवासी मंत्रमुग्ध; पाहा Video
Varanasi AirportDainik Gomantak

Announcement In Sanskrit At Varanasi Airport: तुम्ही भविष्यात कधीही वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिल्यास, तुम्हाला संस्कृत भाषेतून COVID-19 च्या सूचना ऐकू येतील. अहवालानुसार, बनारस हिंदू विद्यापीठा (BHU) च्या सहकार्याने भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने हा उपक्रम सुरु केला आहे. विमानतळावर COVID-19 च्या संबंधी सूचना संस्कृतमधून देण्यात येतात. आतापर्यंत विमानतळावर कोणत्याही प्रकारच्या सूचनांसाठी हिंदी आणि इंग्रजी भाषांचा वापर केला जात होता, मात्र गेल्या शुक्रवारपासून विमानतळावरील सूचनांसाठी संस्कृत ही तिसरी भाषा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. (announcement in sanskrit is heard at varanasi airport of the country must video)

वाराणसी विमानतळावर संस्कृतमध्ये सूचना

वाराणसी (Varanasi) विमानतळाने शुक्रवारी ट्विट करत म्हटले की, 'इंग्रजी आणि हिंदीनंतर आता AAI वाराणसी विमानतळावर संस्कृतमध्येही कोविड मानदंड जाहीर केले जात आहेत. प्रवाशांना विमानतळावर येताच संस्कृतमधील सूचना ऐकू येतील.'

 Varanasi Airport
सोनिया गांधींनी ईडीला केली विनंती, चौकशी दोन दिवसांनी पुढे ढकलावी

दुसरीकडे, विमानतळ संचालिका आर्यमा सन्याल यांनी सांगितले की, 'भाषेला सन्मान देण्यासाठी संस्कृतमधून उपक्रम सुरु करण्यात आला आहे. संस्कृत भाषा घोषित करणाऱ्या एका क्लिपने आता ट्विटरवर खळबळ उडवून दिली आहे. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.' काही यूजर्संनी यावर टीका केली की, 'या भाषेला पुनरुज्जीवित करण्यासाठी काहीही होणार नाही.'

 Varanasi Airport
National Herald Case: राहुल गांधींनी ईडीकडे केली चौकशी पुढे ढकलण्याची मागणी

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी असं म्हटलं

एका ट्विटर यूजरने लिहिले की, 'वाराणसी विमानतळावर संस्कृतमध्ये सूचना देण्यात येत आहेत हे आनंददायी आहे. संस्कृत ही सर्वमान्य भाषा बनवण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. वाराणसी रेल्वे स्थानकावरही हे घडायला हवे. आणखी एका यूजरने लिहिले की, 'प्रवाशांसाठी सूचना केल्या जातात. किती लोकांना संस्कृत समजते? भोजपुरीत का करु नये? किंवा वाराणसीच्या मूळ भाषेत. तिसऱ्या यूजर्सने लिहिले, 'शाळेत संस्कृतला पर्यायी भाषा म्हणून निवडल्याबद्दल मला नेहमीच खेद वाटतो. वाराणसीच्या माझ्या पुढच्या प्रवासात, मला माझी संस्कृत कौशल्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दाखवण्याची आशा आहे. या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com