The Kashmir Files: 'काश्मीर फाईल्स' बाबत बोलताना अनुपम खेर म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे हे ... "

"ही पाच लाख लोकांची गोष्ट आहे ज्यांना १९९० साली त्यांच्या घरातून हिंसकपणे हाकलून देण्यात आलं होतं."
The Kashmir Files
The Kashmir FilesDainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी काश्मीर फाइल्स चित्रपटावर गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख ज्युरींनीच टीका केल्याच्या मुद्दयावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच काश्मीरमध्ये घडलेल्या घटना आणि त्यावर राजकारण्यांनी दिलेले प्रतिसाद यावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांच स्वागत करणारे ते एकमेव राजकारणी होते, असं मत व्यक्त केलं.

अनुपम खेर एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. खेर म्हणाले, "महाराष्ट्रात महाविद्यालयांमध्ये काश्मीरचे विद्यार्थी येऊन आपलं दुःख सांगत होते आणि महाराष्ट्रातील छोटया गावांपर्यंत ते गेले होते. इथपर्यंत काश्मीरमध्ये काय होतंय ही जागृती होती. कारण बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी म्हटलं होतं की या सर्वांचं स्वागत आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये टाका, राहण्यासाठी जागा द्या."

अनुपम खेर म्हणाले, "काश्मीर फाइल्सवर टीकेनंतर माझी पहिली प्रतिक्रिया हिंसक होती. "ही पाच लाख लोकांची गोष्ट आहे ज्यांना १९९० साली त्यांच्या घरातून हिंसकपणे हाकलून देण्यात आलं होतं. घरातून हाकलून देण्याआधी अनेक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. आमच्या अनेक माता-भगिनींवर बलात्कार करण्यात आले होते आणि ३२ वर्षे या गोष्टीला लपवून ठेवण्यात आलं होतं. कोणत्याही सरकारने कोणत्या पक्षाने, पत्रकाराने हे मान्य केलं नाही. ही घटना झाली नाही असं म्हणणं हा खरंतर प्रपोगंड़ा होता," असा आरोप अनुपम खेर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com