तमिळनाडूतील मच्छीमारांना परत आणण्याचे आवाहन

PTI
रविवार, 12 जुलै 2020

जगभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर भारत सरकारच्या वतीने वंदे भारत मोहिम सुरू करण्यात आली. यानुसार विमान, जहाज आणि रस्त्याने परदेशात अडकलेल्या भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले गेले.

चेन्नई

लॉकडाउनमुळे इराणमध्ये अडकलेल्या तमिळनाडूतील ४० मच्छिमारांना परत आणावे, असे आवाहन आज मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केंद्र सरकारकडे केले आहे. देशाच्या वंदे भारत मिशनतंर्गत मच्छीमारांसाठी विशेष विमानाची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जगभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर भारत सरकारच्या वतीने वंदे भारत मोहिम सुरू करण्यात आली. यानुसार विमान, जहाज आणि रस्त्याने परदेशात अडकलेल्या भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले गेले. आयएनएस जलाश्‍वमध्ये जागा नसल्याने इराणमध्ये चाळीस मच्छीमारांचा एक जत्था थांबला आहे. यासंदर्भात पलानीस्वामी यांनी परराष्ट्र मंत्रालयास पत्र लिहले आहे. तत्पूर्वी त्यांनी १९ मे रोजी पत्र लिहले होते. आयएनएस जलाश्‍वच्या मदतीने १ जुलै रोजी ६८१ मच्छीमार तमिळनाडूत सुखरूप परतले. परंतु या जहाजात जागा नसल्याने चाळीस मच्छीमारांना इराणमध्ये राहवे लागले आहे. या मच्छीमारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी असे आवाहन पलानीस्वामी यांनी केले आहे. ६८१ पैकी बहुतांशी मच्छीमार आहेत. हे जहाज एक जुलै रोजी तुतिकोरीनच्या व्होक बंदरावर पोचले. यादरम्यान तमिळनाडूचे सचिव के. बालकृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले असून त्यात इराणमध्ये अडकलेल्या आणि नोकरी गमावलेल्या मच्छीमारांना तातडीने राज्यात परत आणावे, अशी मागणी केली आहे. या मच्छीमारांना जोपर्यंत मायदेशी आणले जात नाही, तोपर्यंत त्यांना भोजनाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. \

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या