पर्यटकांनो जरा थांबा! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या देशातील सर्व स्मारकांवरील पर्यटकांच्या प्रवेशास 15 मे पर्यंत बंदी घातली आहे.

कोरोना मुळे आरोग्ययंत्रणा तसेच अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वच यंत्रणांची ढासळलेली स्थिती पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या देशातील सर्व स्मारक15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे.  त्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत ही सर्व स्मारके एक महिना बंद राहणार असल्याचे समजते आहे. (The Archaeological Survey of India has decided to close all monuments in the country under its control till May 15)

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच लॉकडाऊन सारख्या पर्यायाचा अवलंब करावा लागला होता. त्यावेळी मार्च 2020 मध्ये पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व स्मारके बंद करण्यात आली होती. आता पुन्हा देशात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती चिंताजनक होत जाताना दिसते आहे. देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन आणि अंशतः लॉकडाऊन सारखे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (Archaeological Survey of India) देखील पुढील काही काळासाठी देशातील स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व स्मारकांना १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश एएसआयचे संचालक एनके पाठक यांनी दिले असल्याचे समजते आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: NEETPG- 2021  परीक्षा पुढे ढकलली

यापूर्वी,  डिसेंबर २०२० मध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पर्यटकांच्या (Tourists) संख्येवरील मर्यादा काढून घेण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांनी या गोष्टीची नोंद घेऊन पर्यटनाचे (Tour) नियोजन करणे उत्तम पर्याय ठरणार आहे. 

संबंधित बातम्या