Jammu Kashmir: दहशतवाद्यांचा चौथा प्रयत्नही फसला, लष्कराने 3 घुसखोरांचा केला खात्मा

Jammu Kashmir Latest News: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांचा आणखी एक प्रयत्न जवानांनी हाणून पाडला आहे.
Army
ArmyDainik Gomantak

Jammu Kashmir Latest News: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांचा आणखी एक प्रयत्न जवानांनी हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. विशेष म्हणजे, यामध्ये तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. पोलिसांनी (Jammu Kashmir Police) गुरुवारी ही माहिती दिली.

दरम्यान, उरी सेक्टरमधील कमलकोट भागात मादियान नानक चौकीजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. काश्मीर झोन पोलिसांनी (Police) एका ट्विटमध्ये सांगितले की, 'लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांनी उरीच्या कमलकोट सेक्टरमधील मादियान नानक चौकीजवळ तीन घुसखोरांना ठार केले. यापूर्वी अखनूर सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा (Terrorists) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.'

Army
Jammu-Kashmir: घुसखोरांचा LOC जवळ जाण्याचा प्रयत्न; गोळीबारात जखमी

अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरांचा प्रयत्न फसला

जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) अखनूर सेक्टरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा जवानांनी पाठलाग केला. गेल्या 4 दिवसांत जवानांनी दहशतवाद्यांचा चौथा प्रयत्न हाणून पाडला. काल रात्री नौशेरा सेक्टरमध्येही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने तो हाणून पाडला.

Army
Jammu And Kashmir: दहशतवाद्याचा कबुलनामा, हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्कराने पाठवले

एक दहशतवादी जिवंत पकडला

नौशेरा सेक्टरबद्दल बोलायचे झाल्यास, तिथे एक दहशतवादी जिवंत पकडला गेला, तर दोन दहशतवादी स्फोटात ठार झाले. नौशेराच्या झांगार सेक्टरमध्ये तैनात जवानांनी 21 ऑगस्टला सकाळी नियंत्रण रेषेवर 2-3 दहशतवाद्यांची घुसखोरी पाहिली. एका दहशतवाद्याने भारतीय चौकीजवळ येऊन कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार केला तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आणि पकडला गेला. यासोबत आलेले आणखी दोन दहशतवादी जंगलाच्या आडून पळून गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com