भारतीय लष्करप्रमुख Bhutan दौऱ्यावर, ड्रॅगनने सीमेवर वसवले गाव!

Indian Army Chief: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात केली.
Indian Army Chief
Indian Army ChiefDainik Gomantak

Army Chief General Manoj Pandey: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात केली आहे. लष्करप्रमुखांचा भूतान दौरा अशा वेळी आला आहे, जेव्हा चीन पुन्हा एकदा डोकलाम भागात पायाभूत सुविधा विकसित करु लागला आहे.

दरम्यान, भूतानच्या बाजूने डोकलाम पठाराच्या पूर्वेकडे चीनने एक चिनी गाव वसवल्याचे वृत्त आहे. हे क्षेत्र भारताच्या सामरिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. खरे तर, काही दिवसांपूर्वी सॅटेलाइट इमेजमधून चीन (China) डोकलाम पठाराच्या पूर्वेला एक गाव वसवत असल्याचे दिसून आले होते.

Indian Army Chief
माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल एस. एफ रॉड्रिग्ज यांचे निधन

दुसरीकडे, भारताच्या (India) सामरिक हितासाठी हा प्रदेश महत्त्वाचा मानला जातो. हे चित्र समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे.

तसेच, भारतीय लष्कराकडून (Indian Army) सांगण्यात आले की, 'जनरल पांडे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांना भेटणार आहेत. तसेच रॉयल भूतान आर्मीमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा करणार आहेत.'

Indian Army Chief
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्करप्रमुख, सरकारने नियुक्तीला दाखवला हिरवा कंदील

शिवाय, डोकलाम पठारावरील एकूण परिस्थिती पाहता या भागातील चिनी कारवायांचा मुद्दा जनरल पांडे भूतानमधील (Bhutan) चर्चेत उपस्थित करतील. लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, "या भेटीमुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी वाढतील, ज्यामध्ये विश्वास, सद्भावना आणि परस्पर सामंजस्य यांचा समावेश असेल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com