लष्करप्रमुखांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; भारतीय सैन्यांची रुग्णालये नागरिकांसाठी खुली

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

भारतीय सैन्यांकडून कोरोनावर मात करण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध उक्रमांविषयी माहिती दिली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज लाखोच्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन (Oxygen), रेमडिसिव्हीर (Remdisivir) अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता भासत आहे. अमेरिका (America), रशियासह (Rashia) जगभरातील अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणही कठीणं झालं असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. दरम्यान आज भारताच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेऊन भारतीय सैन्यांकडून कोरोनावर मात करण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध उक्रमांविषयी माहिती दिली आहे.(Army chief meets PM Modi Indian Army hospitals open to civilians)

लष्करप्रमुख नरवणे (Chief of Army Staff General MM Naravane) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितलं की, सैन्यांचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याशिवाय विविध ठिकाणी भारतीय लष्कराकडून तात्पुरती रुग्णालय देखील उभारली जात आहेत.

नरेंद्र मोदींची निवड करून देशाची पाच वर्षे अंधकारात लोटली

नरवणे यांनी पुढे सांगितलं की, भारतीय सैन्यांकडून नागरिकांसाठी शक्य असेल त्या ठिकाणी रुग्णालये स्थापन केली जात आहेत. नागरिक त्यांच्या जवळ असणाऱ्या रुग्णालयामध्ये जाऊ शकतात.

तसेच, आयात केलेले ऑक्सिजन टॅंकर आणि वाहनं जिथं त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक असेल तेथे सैन्यदल मनुष्यबळासंह मदत करत आहेत. अशी देखील माहिती यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

संबंधित बातम्या