लष्करात नो फेसबुक, नो इन्स्टाग्राम

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून जवानांपर्यंत सर्वांनाच फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावरील त्यांचे अकाउंट्‌स बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे : लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून जवानांपर्यंत सर्वांनाच फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावरील त्यांचे अकाउंट्‌स बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण ८९ ॲपच्या वापरावरही बंदी घातली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणाही कार्यान्वित केल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय लष्कराकडून घेण्यात आला आहे.

सोशल मीडियाचा सरसकट वापर बंद करण्यात आलेला नाही. या बंदीत व्हॉट्सअॅप, ट्विटर यांचा समावेश नाही. मात्र, फेसबुक व इन्स्टाग्राम यांचा समावेश आहे. देशात गेल्या चार वर्षांत हनी ट्रॅपची सुमारे २५ प्रकरणे झाली आहेत. तसेच, हेरगिरीच्या काही प्रकरणांतही फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर संभाषणासाठी झाल्याचे दिसून आले आहे. फेसबुकवरील अपडेट्सचा वापर राष्ट्रविघातक घटक करीत असल्याचेही तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले होते. चीन आणि पाकिस्तानमधील यंत्रणाही देशातील सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याचे वारंवार आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर फेसबुक, इन्स्टाग्रामसह काही ई-कॉमर्स ॲप, डेटिंग ॲप, व्हिडिओबेस्ड ॲपवरही बंदी घातली आहे. 

संबंधित बातम्या