अर्णव गोस्वामी यांना अखेर जामीन

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

अंतर्गत सजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीनाचा दिलासा मिळाला. त्यांची रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.

मुंबई : अंतर्गत सजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीनाचा दिलासा मिळाला. त्यांची रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.

न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर गोस्वामींसह याप्रकरणातील आरोपी नितीश सारडा आणि फिरोज शेख यांचाही जामीन मंजूर केला. जामीन नामंजूर करण्यात मुंबई उच्च न्यायालयाने चूक केली, असे मतदेखील न्यायालयाने व्यक्त केले.

अलिबाग पोलिसांनी अटक केलेल्या अर्णव गोस्वामींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. तसेच, अलिबाग सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने आता हस्तक्षेप केला नाही; तर व्यक्ती स्वातंत्र्याचा ऱ्हास होण्याच्या मार्गाने आपला प्रवास सुरू होईल. 

संबंधित बातम्या