'रामाची' भूमिका साकारणारे अरुण गोविल भाजपात

Arun Govil playing the role of Ramachi in BJP
Arun Govil playing the role of Ramachi in BJP

नवी दिल्ली:(Arun Govil playing the role of Ramachi in BJP) आगामी काळात पाच राज्यांच्या निवडणूका होणार आहेत. याच  पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या एन्ट्रीनंतर आता रामायणामध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजप पक्षाच्या मुख्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला. मात्र अद्याप भाजपकडून त्यांच्यावर  कोणत्याही प्रकारची जबाबदारी सोपवलेली नाही. मात्र आगामी पाच राज्यांच्या पार्श्वभूमीवर अरुण गोवील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे भाजपकडून निवडणूकांच्या प्रचारात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या प्रचारसभांतून त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला होता.(Arun Govil playing the role of Ramachi in BJP)

सुमारे तीन दशकांपूर्वी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने भारतामधल्या प्रेक्षकांवर छाप पाडली होती. रामायण मालिकेने टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक विक्रम मोडले होते. विशेष म्हणजे रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोवील हे बाहेरच्या जगात दैनंदिन वावरत असताना देखील त्यांना लोक राम समजून पाया पडत त्यांचा गौरव करत असत. यासंबंधीचे अनेक किस्से अभिनेते अरुण गोवील यांनी वेळोवेळी अनेकदा सांगितले होते.

अरुण गोवील यांच्या भाजपप्रवेश झाला त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह उपस्थित होते. यावेळी गोवील म्हणाले, ‘’मला याआधी राजकारण बिलकुल  कळत नव्हतं. मला जे काही वाटत ते मी करत असे. आता मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. आणि आता भाजप हा सगळ्यात सर्वोत्तम पर्याय आहे,’’ असं म्हणत गोवीलांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ‘’पहिल्यांदा मी पाहिलं की  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी जय श्री राम या     घोषणेची अ‍ॅलर्जी झाली आहे. जय श्री राम ही फक्त घोषणा नाही,’’ असं ते       यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com