अरुणाचल प्रदेश भूकंपाने हादरले, जीवीत अन् वित्तीय हानी टळली
Dainik Gomantak

अरुणाचल प्रदेश भूकंपाने हादरले, जीवीत अन् वित्तीय हानी टळली

सकाळी दहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

अरुणाचल प्रदेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. सकाळी दहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार,रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.1 मोजण्यात आली आहे. परंतु, आतापर्यंत भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही.

यापूर्वी 25 सप्टेंबर रोजी राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हे धक्के सकाळी 10. 11 वाजता पांगिनपासून 237 किमी उत्तर ते पूर्व दिशेने जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलवरअसल्याची माहिती दिली होती.

अरुणाचलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजीने कळवले होते की, अरुणाचलमधील चांगलांगपासून 70 किमी उत्तर-पश्चिमेस दुपारी 3:6 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल मोजण्यात आली होती. भूकंपामुळे लोक घाबरले होते. परंतु कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत नाही.

Related Stories

No stories found.