AAP ची धुरा पुन्हा अरविंद केजरीवालांकडेच

दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi Chief Minister) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) निमंत्रक म्हणून निवडले गेले आहेत.
AAP ची धुरा पुन्हा अरविंद केजरीवालांकडेच
Arvind Kejriwal elected as national coordinator of AAPDainik Gomantak

दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi Chief Minister) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) निमंत्रक म्हणून निवडले गेले आहेत. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक आज पार पडली असून त्याच बैठकीत ज्यात राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. (Arvind Kejriwal elected as national coordinator of AAP)

यानंतर, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय संयोजक, पंकज गुप्ता यांची सचिव म्हणून आणि राज्यसभा खासदार एन डी गुप्ता यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड केली आहे. या साऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा अस्नफ आहे.

अरविंद केजरीवाल यांना सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक बनवण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, पक्षाच्या घटनेत सुधारणा करून अनेक बदल करण्यात आले. घटनेने आधी म्हटले होते की कोणताही सदस्य पदाधिकाऱ्यासारखा पदावर सलग दोन वर्षापेक्षा अधिक काळ तीन वर्षांच्या पदावर राहू शकणार नाही, परंतु हे नंतर बदलण्यात आले. आणि त्याचमुळे अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक झाले आहेत.

Arvind Kejriwal elected as national coordinator of AAP
आता 18 वर्षाच्या आतील मुलांनाही मिळणार कोरोना लस! ZyCoV-D ऑक्टोबरमध्ये येणार

पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्या आम आदमी पार्टीसाठी खूप महत्वाच्या मानल्या जात आहेत .आप हा पंजाबमधील मुख्य विरोधी पक्ष आहे आणि यावेळी तो निवडणुकीत विजयाचा दावा करत आहे. याशिवाय, पक्ष उत्तराखंडमध्येही निवडणूक रिंगणात उतरणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पुढील वर्षी गोवा आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत, जिथून पक्षाला मोठ्या आशा आहेत. सुरतच्या स्थानिक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अनेक बड्या व्यक्तिमत्त्वे सर्वसाधारणपणे आप मध्ये प्रवेश करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com