आम आदमी पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

सलग दुसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर येणाऱ्या दोन वर्षात आम आदमी पक्ष  सहा राज्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

नवी दिल्ली:  सलग दुसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर येणाऱ्या दोन वर्षात आम आदमी पक्ष सहा राज्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी पक्षाने आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. आम आदमी पक्षाने यापूर्वी पंजाब आणि गोव्यामध्ये निवडणुका लढवल्या होत्या. 2017 च्या विधानसभा निवडणुकांच्य़ा तुलनेत पक्षाला 20 जागा जिंकता आल्या.

चार वर्षांनंतर शशिकला तुरुंगाबाहेर

कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. 26  जानेवारीला निघालेल्या शेतकऱ्य़ांच्या रॅलीला ज्याप्रकारे हिंसक वळण लागले ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होते. या शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसक वळण देणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी. मात्र या घटनेमुळे हे आंदोलन पूर्णपणे संपू शकत नाही. आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिले पाहिजे, त्याचबरोबर यापुढे या आंदोलनाला हिंसक वळण लागणार याची दक्षता घेतली पाहिजे. असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात 11 चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र कृषी कायद्यांवर आपेक्षित तोडगा निघू शकला नाही. आंदोलना दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. केजरीवालांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘’तुम्ही ज्यावेळेसही आंदोलनस्थळी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाल त्यावेळी आपल्या पक्षाचा झेंडा आणि टोपी सोडून आपण देशाचा एक नागरिक म्हणुन जा. आंदोलनाच्या ठिकाणी कोणत्याही प्ररकारचा राजनैतीक प्रचार प्रसार करु नका’’ असेही ते यावेळी म्हणाले.  

 

 

संबंधित बातम्या