अरविंद केजरीवाल यांच पंतप्रधान मोदींना पत्र
arvind kejriwal letter to narendra modi

अरविंद केजरीवाल यांच पंतप्रधान मोदींना पत्र

दिल्लीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिथिती वाईट होत चालली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना रुग्णांसाठी 7000 बेड आरक्षित करण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी तातडीने ऑक्सिजन देण्यास सांगितले आहे.  गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे सुमारे 25 हजार रुग्ण सापडले आहेत अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली होती.  चिंतेची बाब म्हणणे गेल्या 24 तासांत पॉसिटीव्हिटीचे प्रमाण 26 टक्के  वरुन 30 टक्के पर्यंत वाढले आहेत. कोरोनाची बेड झपाट्याने संपत आहेत. आयसीयू बेडची कमतरता आहे. संपूर्ण दिल्लीत 100 पेक्षा कमी आयसीयू बेड शिल्लक आहेत. आम्ही सतत केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत आणि आम्हाला मदतही मिळत आहे. (Arvind Kejriwal's letter to Prime Minister Modi)

2-3  दिवसात करणार 6000 बेड तयार
अरविंद केजरीवाल काल  डॉ हर्षवर्धन यांच्याशी बोललो असता, आम्हाला बेड आणि ऑक्सिजनची खूप गरज असल्याचे सांगितले. दिल्लीतील केंद्र शासकीय रुग्णालयात 10,000 बेड आहेत, त्यापैकी 1000 बेड कोरोनासाठी आरक्षित आहेत. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे अशा गंभीर परिस्थितीत कोरोनासाठी किमान 7000 बेड राखीव असावेत आणि त्वरित ऑक्सिजन पुरवावा. दिल्ली सरकार येत्या 2-3 दिवसांत 6000 हून अधिक ऑक्सिजन बेड तयार करेल.

रेल्वे स्थानकांवर कोरोनासाठी बेड देण्याची मागणी
आनंद विहार आणि शकूर बस्ती रेल्वे स्थानकांवर कोरोना बेडची व्यवस्था करण्याचे आवाहन दिल्ली सरकारने रेल्वेला केले आहे. गेल्या वर्षी कोरोना शिखरावर असताना, रेल्वेने दिल्लीत पाच हजार कोरोना बेडची व्यवस्था केली होती. तसेच त्यांनी ही व्यवस्था यंदाही करावी. त्यांच्याकडे ऑक्सिजन सपोर्ट, वैद्यकीय कर्मचारी आणि ऑक्सिजन व्यवस्था देखील असावी अशी विनंती दिल्ली सरकारने केली आहे. 

मागच्या 24 तासात 167 मृत्यू
 48 तासांपूर्वी कोरोनाचे 19,500 रुग्ण आढळले होते . गेल्या 24 तासांत 24,500 रुग्ण आली आहेत. या आकडेवारीवरून दिसते आहे दिल्लीत रुग्ण संख्या किती वेगाने वाढत आहे.  बर्‍याच रुग्णालयात उच्च फ्लो ऑक्सिजनची व्यवस्था करीत असल्याची माहिती केजरीवालांनी दिली. राधास्वामी सत्संग, यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॉमन वेल्थ गेम व्यतिरिक्त शाळांमध्येही व्यवस्था केली जात आहे. गेल्या 24 तासात दिल्लीतील कोरोना  167 लोक मरण पावले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीत ही सर्वाधिक आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com