असदुद्दीन ओवेसींच्या 'एमआयएम'ची ‘मिशन यूपी’ला सुरुवात

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

बिहारच्या राजकीय रणांगणामध्ये यशस्वीरीत्या पाय रोवल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता उत्तरप्रदेशावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. 

लखनौ : बिहारच्या राजकीय रणांगणामध्ये यशस्वीरीत्या पाय रोवल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता उत्तरप्रदेशावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. ओवेसी यांनी आज लखनौमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते आणि कधीकाळी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेल्या ओमप्रकाश राजभर यांची  भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. भाजपवर निशाणा साधताना ओवेसी यांनी मी येथे नावे बदलण्यासाठी नाही तर मने जिंकण्यासाठी येथे आलो आहे असे सूचक वक्तव्य केले.ओेवेसी त्यांच्या या दौऱ्यामध्ये प्रगतिशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यात २०२२ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी कंबर कसली आहे.

 

मायावतींची नजर एमआयएमवर

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या 
ओवेसी यांच्यासोबत हातमिळवणी करून दलित मुस्लिम कार्ड खेळण्याच्या विचारात आहेत. बिहारमध्ये एमआयएमला मिळालेले राजकीय यश लक्षात घेऊन मायावती यांनी आता नव्या मित्राला जोडण्यासाठी कंबर कसली आहे.

 

अधिक वाचा :

‘एमसीआय’च्या निर्णयाने परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय 

अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेल्या जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 

 

संबंधित बातम्या