शाहिद जमील यांच्या राजीनाम्यानंतर ओवीसींची मोदी सरकारवर टीका

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 मे 2021

कोरोनाव्हायरसचे विविध प्रकार शोधण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला आहे.

देशातील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील(S.Jameel) यांनी वैज्ञानिकांच्या सल्लागार गटाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. यावरुनच एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मार्चच्या सुरुवातीला इन्सोकॉगने पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक भारतीय उत्परिवर्तनाविषयी माहिती दिली होती, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. कोरोनाव्हायरसचे विविध प्रकार शोधण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला आहे. जमील वैज्ञानिक सल्लागार समूहाच्या इनसकॉग या फोरमचे अध्यक्ष होते.(Asaduddin Owaisi criticizes Modi government after Shahid Jamils resignation)

COVID-19 लसीकरणासाठी आता आधार कार्डची गरज नाही: UIDAI चे स्पष्टीकरण 

ओवेसी यांनी सोमवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, " INSACOG या शासकीय वैज्ञानिक सल्लागार गटाचे अध्यक्ष एस. जमील यांनी राजीनामा दिला. मार्चच्या सुरुवातीला धोकादायक भारतीय उत्परिवर्तकांबद्दल पंतप्रधान कार्यालयाला इन्सॉकाने चेतावनी दिली होती, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही असं जमील स्पष्टपणे म्हटले होते, सरकारने विज्ञानाला महत्त्व दिले नाही. आम्ही मोदींच्या वैज्ञानिक आकलनाची किंमत देत आहोत. "

जमील यांनी काही आठवड्यांपूर्वी कोरोना महामारी संबंधित असलेल्या सरकारच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित केले होते. रविवारी माध्यमाशी बोलताना जमील यांनी म्हटले की,आपल्या राजीनाम्याबद्दल सांगणे म्हणजे माझी असहायता दर्शवत नाही.

संबंधित बातम्या