West Bengal Elections 2021: "नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी बहीण-भाऊ आहेत"

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी सुद्धा प्रचारासाठी जोर लावताना दिसून येत आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांना धारेवर धरत ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठे घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा एकही प्रयत्न सोडलेला दिसत नाही. त्यातच आता एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी सुद्धा प्रचारासाठी जोर लावताना दिसून येत आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांना धारेवर धरत ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Asaduddin Owaisi has slammed both Narendra Modi and Mamata Banerjee.)

अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी

पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये प्रचार सभेला संबोधित करत असताना ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात काहीच फरक नाही अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. यावेळी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी 'नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी हे बहीण भाऊ असून दोघेही आपल्या आपल्या विधानांनी लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत असतात' असे सांगितले. तसेच त्यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेच्या सरकार सुद्धा टीका केल्याचे दिसून आले आहे. यावेळी बोलताना 'मागच्या दहा वर्षात तुम्ही मुस्लिमांसाठी काय केले हे सांगा' असे आवाहन त्यांनी तृणमूल काँग्रेसला केले आहे. यापूर्वी देखील असदुद्दीन ओवैसी यांनी ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी  यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका सुरु असून आता पर्यंत चार टप्पे पूर्ण झाले आहेत. येणाऱ्या पाचव्या टप्प्यासाठी सध्या प्रचार सुरु असून या टप्प्यात  विधानसभांच्या 45 जागांवर 17 वापरही रोजी मतदान पार पडणार आहे. एकूण 8 टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांचे निकाल 2 मी रोजी जाहीर केले जाणार आहेत. 

संबंधित बातम्या