'गोत्र' संगितल्याच्या मुद्द्यावरून ओवैसींनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

एका  प्रचार सभेत ममता बॅनर्जी यांनी आपले गोत्र सांगितले होते. त्यावर ए आय एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतला आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सध्या जोर धरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदाना पार पडले असून, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिल रोजी  पार पडणार आहे. सर्वच पक्षाचे नेते निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जोरदार मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळते आहे. अशाच एका  प्रचार सभेत ममता बॅनर्जी यांनी आपले गोत्र सांगितले होते. त्यावर ए आय एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतला आहे. (Asaduddin Owaisi targets Mamata Banerjee after telling Gotra)

भाजप विरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे; सोनिया गांधींसह विरोधी पक्षांना ममता...

मध्ये प्रचार सभेत उपस्थितांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी एक अनुभव सांगितलं. एका मंदिरात गेलो असता आपल्याला पुजाऱ्याने आपले गोत्र विचारले होते, त्यावर आपले गोत्र माँ, माती और माणुष  असल्याचये आपण सांगितले असे आपण सांगितल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता "खरे तर आपले गोत्र शांडिल्य आहे." असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या गोत्र सांगण्याच्या मुद्द्यावरून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisi) यांनी आता ममता बॅनर्जींवर(Mamta Banerjee) निशाणा साधला आहे. या प्रकरणावर ट्विट करत ओवेसी यांनी " आपल्या सारख्या लोकांनी काय केले पाहिजे जे शांडिल्य किंवा जनयुधारी नाहीत, विशिष्ट देवतांचे भक्त नाहीत, चालीसा पठण करत नाहीत किंवा काही पूजा पाठ करत नाहीत?  प्रत्येक पक्षाला वाटते की जिंकण्यासाठी हिंदू ओळख असणे आवश्यक आहे." असेच दिसत असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 294 विधानसभांच्या (Assembly Elections) जागांसाठी निवडणूका होत आहेत. आठ टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांचे निकाल 2 मी रोजी लागणार आहेत. 27 मार्च रोजी या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला असून उद्या 1 एप्रिल रोजी दुसरा टप्पा पार पडणार आहे. 

संबंधित बातम्या