"मोदीजी देशाच्या जनतेला टोप्या घालू नका"

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुस्लिम व्यक्तीबरोबर असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबतची ती व्यक्ती कोण आहे याची आता चर्चा सुरु झाली आहे. याच मुद्द्यावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा 2021 च्या निवडणूक प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुस्लिम व्यक्तीबरोबर असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबतची ती व्यक्ती कोण आहे याची आता चर्चा सुरु झाली आहे. याच मुद्द्यावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.( Asaduddin Owaisi targets narendra modi on viral photo)

राकेश्वर सिंग यांनी सांगितली नक्षलींच्या ताब्यात असतानाची कहाणी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला असून दोघांमध्ये संवाद  होत असल्याचे दिसून आले आहे. याच फोटोवर असदुद्दीन ओवैसी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये  त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या संभाषणावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी तो व्यक्ती पंतप्रधानांना सांगत होता की  "मोदीजी मी बांगलादेशी नाही, आणि मी कागदपत्र सुद्धा दाखवणार नाही" असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.  

एवढ्यावर न थांबता असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) पुढे असेही म्हणाले की, त्या व्यक्तीने मोदीजींना सांगितले असावे की 'मोदी जी आम्ही तिहेरी तालक कायदा स्वीकारत नाही'. टोपीच्या मुद्द्यावर बोट ठेवत ओवैसी यांनी तो व्यक्ती पंतप्रधान मोदी याना म्हणाला असेल की "मी डोक्यावर टोपी घालतो आहे पण आपण देशातील लोकांच्या डोक्यावर टोप्या नका लावू" असे म्हणत ओवैसींनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या