Assam Accident: ब्रह्मपुत्रा नदीवर जहाजांचा मोठा अपघात; अनेक लोक बेपत्ता

जोरहाट जिल्ह्यातील निमती घाटाजवळ (Nimati Ghat Accident) प्रवाशांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाली
Assam Accident: Boat capsized on Nimati ghat in Brahmaputra river
Assam Accident: Boat capsized on Nimati ghat in Brahmaputra riverTwitter

आसाममधील (Assam) ब्रह्मपुत्रा नदीवर (Brahmaputra river accident) एक भयानक बोट अपघाता झाला आहे (Assam Accident). जोरहाट जिल्ह्यातील निमती घाटाजवळ (Nimati Ghat Accident) प्रवाशांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाली असून या अपघातात अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्यासाठी घटनास्थळावर पोहोचले आहेत. (Assam Accident: Boat capsized on Nimati ghat in Brahmaputra river)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बोटींमध्ये सुमारे 120 प्रवासी होते. एक बोट माजुलीहून निमतीघाटकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. दोघांमध्ये समोरासमोर टक्कर झाली, त्यानंतर बोट उलटली.

बोट अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी माजुली आणि जोरहाट जिल्हा प्रशासनांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

Assam Accident: Boat capsized on Nimati ghat in Brahmaputra river
Vaccination: ''डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन' चा आदेश नाही

ते म्हणाले की, केंद्र सरकार सर्व शक्य ती मदत करण्यास तयार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडून परिस्थिती जाणून घेतली आहे. मुख्यमंत्री गुरुवारी माजुलीला भेट देतील. येथे जोरहाट जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुर जैन यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू झाले आहे त्याचबरोबर काही लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत बोलताना दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी "आसाममधील बोट दुर्घटनेमुळे दुःखी असून . प्रवाशांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो." असे ट्विट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com