Assam Assembly Election 2021: आसाममध्ये  भाजपा आघाडीवर; मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा 

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू हाती आहेत. संध्याकाळपर्यंत पूर्ण निकाल येणे अपेक्षित आहेत.

आसाम : राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू हाती आहेत. संध्याकाळपर्यंत पूर्ण निकाल येणे अपेक्षित आहेत. तथापि, राज्यातील विधानसभा निवडणुकीतील 126 पैकी 117 जागांचे निकाल हाती येऊ लागले आहेत.  नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार, आसाममध्ये भाजपा 81 जागांवर आघाडीवर, कॉंग्रेस 45  जागांवर पिछाडीवर आहे. तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. यानुसार, भाजपाने सलग दुसऱ्यांदा भाजपाने सत्ता राखण्यात यशस्वी होताना दिसत आहे. आसामचे भाजपाचे मुख्यमंत्री सोनभ्रद सोनोवाल यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन करत असल्याचा दावा केला आहे.  तसेच भाजपचा मित्रपक्ष आसाम गण परिषदेने 10 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याशिवाय ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट 11, बोडोलँड पीपल्स फ्रंट तीन, युनायटेड पीपल्स पार्टी 7 आणि 1 जागा अपक्ष उमेदवार आहेत.  (Assam Assembly Election 2021: BJP leads in Assam; Chief Minister claims to form government for the second time) 

भाजपा 81 
कॉँग्रेस 45 
इतर 3 
 

संबंधित बातम्या