Himanta Biswa Sarma: मुस्लिम महिलांनी दोन पेक्षा जास्त मुले जन्माला घालू नयेत; आम्ही 25 मुले जन्माला घालू...

मुस्लीमांच्या चार लग्नाबाबत काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा
Assam CM Himant Biswa Sarma
Assam CM Himant Biswa SarmaDainik Gomantak

Himanta Biswa Sarma: आमचे धोरण स्पष्ट आहे, भाजप मुस्लिमांच्या अनेक लग्ने करण्याच्या विरोधात आहे, मुस्लिम भगिनींनी दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालू नयेत, असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी केले आहे. आसामच्या मोरिगाव येथील सभेत ते बोलत होते. आम्हीही 25 मुले जन्माला घालू शकतो... असेही ते म्हणाले.

Assam CM Himant Biswa Sarma
Uniform Civil Code Bill: समान नागरी कायद्यासंबंधी राज्यसभेत मांडले खासगी विधेयक, विरोधकांचा हल्लाबोल

पुर्व बंगाल किंवा बांग्लादेशातून आलेल्या बंगाली भाषिक मुस्लिमांना आसाममध्ये पोमुवा मुस्लिम म्हणून ओळखले जाते. त्यांच्याविषयी सरमा म्हणाले की, आमचे धोरण स्पष्ट आहे. पोमुवा मुस्लीमांनी त्यांच्या मुलांना मदरशात पाठवून जुनाब, इमाम बनविण्याऐवजी डॉक्टर, इंजिनियर बनवावे. जर आसामचे हिंदू लोक हे करू शकतात, तर मुस्लिम कुटूंबियांनीही तसा विचार करायला हवा.

मुस्लीम भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी बदरूद्दीन यांसारख्यांच्या मतांना बळी पडू नये. त्यांनी दोन पेक्षा जास्त मुले जन्माला घालू नयेत. अनेक आमदार असे सांगू शकत नाहीत कारण त्यांना मुस्लिमांची मते हवी असतात.

सरमा म्हणाले की, आसाममध्ये बदरूद्दीन अजमल सारखे नेते आहेत. त्यांना वाटते की महिलांनी केवळ मुलांना जन्म दिला पाहिजे. जणू महिला म्हणजे मुले जन्मला घालणारे मशिन आहे. महिला 20-25 मुलांना जन्म देऊ शकतात, पण त्यांच्या खाण्यापिण्याचा, कपडे, शिक्षण इतर खर्चाचा भार अजमल यांना उचलायला लावले पाहिजे. आम्हाला काही अडचण नाही. जोपर्यंत पहिल्या पत्नीला घटस्फोट देत नाही तोपर्यंत पुरूषांना तीन-चार महिलांशी लग्न करण्याचा अधिकार नाही. जर मुस्लिम मुलींना हिजाबची सक्ती केली जात असेल तर तशीच सक्ती मुलांना का केली जात नाही.

Assam CM Himant Biswa Sarma
Himachal CM Face: हिमाचलमध्ये नवा मुख्यमंत्री निवडणे काँग्रेससाठी बनले डोकेदुखी!

सरमा म्हणाले की, परफ्युम व्यापारी ते लोकसभा खासदार असा प्रवास केलेले बदरूद्दीन मुलांचा खर्च देऊ शकत नसतील तर त्यांना कुणाच्याही मुलांच्या जन्मावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आपण तितकीच मुले जन्माला घालावीत, ज्यांचा आपण सांभाळ करण्याची क्षमता आपल्यात आहे. ज्यांचे आपण पोट भरू शकू, ज्यांना चांगला माणूस बनवू शकू अशी क्षमता आपल्यात आहे, तेवढीच मुले जन्माला घालावीत.

धुबरी येथील लोकसभा खासदार बदरूद्दीन अजमल 2 डिसेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, वयाच्या 40 वर्षानंतर आई-वडील लग्न दबावात करत असतात. त्यांच्याकडून मुले जन्माला घालण्याची अपेक्षा करता येऊ शकत नाही. जर जमिन सुपिक असेल तरच बीज पेरले जाते, पिक चांगले येते. हिंदुनींही मुस्लिमांचा फॉर्म्युला वापरावा. मुलांचे लग्न 20-22 वर्षांतच करावे. मुलींची लग्ने 18-20 वर्षातच करावीत. मग पाहा किती मुले जन्माला येतात. दरम्यान, यावरून वाद वाढल्यानंतर खासदार अजमल यांनी माफी मागितली होती. मला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com