Assam Flood: आसाममध्ये पुराचा कहर सुरूच, मृतांची संख्या 82 वर

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवित आणि मालमत्तेचे बरेच नुकसान होत आहे.
Assam Flood: आसाममध्ये पुराचा कहर सुरूच, मृतांची संख्या 82 वर
Flood in Assam Dainik Gomantak

उत्तर-पूर्व राज्यातील आसाममध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील 35 पैकी 33 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, 20 जून रोजी पुरामुळे आणखी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हा आकडा 82 वर पोहोचला आहे. बाधित भागात सतत मदत आणि बचाव कार्य सुरू असूनही या आपत्तीमुळे ४७ लाख लोकांना बेघर व्हावे लागले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय पथकाच्या पूरग्रस्त भागाच्या भेटीबाबत गृहमंत्री शाह यांनीही चर्चा केली आहे.

ASDMA बुलेटिनमध्ये ताज्या पूरस्थितीचा उल्लेख केला आहे

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बुलेटिननुसार, आसाममधील पुरामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे 47 लाख लोकांच्या जीवित आणि मालमत्तेवर संकट आले आहे. सोमवारी पुरामुळे आणखी 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरातील मृतांचा आकडा 82 वर पोहोचला आहे. ASDMA अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून राज्यातील ताज्या परिस्थितीची माहिती घेतली. गेल्या एक आठवड्यापासून देशाचे ईशान्येकडील राज्य नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत आहे. या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांतील लोकांना पुराचा फटका बसला आहे.

Flood in Assam
AK-47 अन् हँडग्रेनेड बाळगल्याप्रकरणी MLA अनंत सिंग यांना सुनावली 10 वर्षांची शिक्षा

लोकांना आणि पोलिसांना वाहून नेले

पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दारंग येथे तीन पोलीस कर्मचारी वाहून गेले. यासोबतच कचार, दिब्रुगड, हैलाकांडी, होजई, कामरूप आणि लखीमपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. उदलगुरी आणि कामरूपमध्ये प्रत्येकी दोन आणि कचार, दररंग आणि लखीमपूरमध्ये प्रत्येकी एकासह सात जण बेपत्ता असल्याची नोंद आहे.

पुरापेक्षाही वाईट परिस्थिती

राज्याचा करीमगंज परिसर असो वा अन्य कुठलाही भाग, पाणीच दिसते. रस्त्यांचे तलावात रुपांतर झाले आहे. पुराचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे लोक घरे सोडून सुरक्षित स्थळाच्या शोधात भटकत आहेत. पुराच्या काळात लोक कसेतरी लहान मुलांना घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. करीमगंजमध्ये सुमारे एक लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनाने लोकांसाठी 73 मदत शिबिरे उभारली आहेत. जिथे लोकांना पुरापासून वाचवून सुरक्षित ठेवले आहे. दरम्यान, आसाम आणि मेघालयातील पूर आपत्ती पाहता गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com