धक्कादायक! अयोध्येत नागा साधू कन्हैया दास यांची दगडाने ठेचून हत्या

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागा साधूंची गर्दी झाली असल्याची माहिती मिळते आहे.         

अयोध्येतील चरण पादुका आश्रम परिसरात आज सकाळी एक मृतदेह आढळून आला होता. नागा साधूच्या वेशात असणाऱ्या या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात अली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागा साधूंची गर्दी झाली असल्याची माहिती मिळते आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (Assassination of Naga Sadhu Kanhaiya Das in Ayodhya)

अयोध्येच्या (Ayodhya) रायगंज परिसरातील चरण पादुका आश्रमात असलेल्या गोशाळेत रविवारी सकाळी 45 वर्षीय नागा साधू (Naga Sadhu) कन्हैय्या दास यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच या परिसरातील साधूंनी तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी दाखल होत या घटनेची दखल घेतली. मृतव्यक्तीच्या डोक्यावर गंभीर वार करून हत्या करण्यात आली, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागा साधूंनी या परिसरात गर्दी केली असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी लगेचच मृतदेह ताब्यात घेतला असल्याचे समजते आहे.

कर्नाटकात पती-पत्नीच्या वादात 6 जणांचा मृत्यू

या घटनेतील प्रमुख आरोपी गोलू दास उर्फ शशिकांत दास यास ताब्यात घेऊन पोलिसांनी (Police) चौकशी सुरु केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आरोपी गोलू दास हा मृतव्यक्तीचा गुरुभाऊ असल्याचे समजते आहे. घर आणि जमिनीच्या मुद्द्यावरून मृत साधू कन्हैय्या दास आणि आरोपी गोलू दास यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. याच वादातून मृत कन्हैय्या दास यांची हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

संबंधित बातम्या