Assembly Election 2021: पंतप्रधान मोदींनी या चार भाषांमध्ये केलं मतदारांना आवाहन

Assembly Election 2021: पंतप्रधान मोदींनी या चार भाषांमध्ये केलं मतदारांना आवाहन
Assembly Election 2021 Prime Minister Narendra Modi has called for voting in Bengali Malayalam Tamil and English language

नवी दिल्ली: देशातील पाच निवडणूक राज्यांमध्ये (Assembly Election 2021)  आज मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam) केरळ (kerala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी (Puducherry) यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व राज्यांच्या मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी बंगली, मल्याळम, तामिळ आणि इंग्रजी भाषांमध्ये ट्विट करुन लोकांना मतदान करण्यास सांगितले आहे.

"केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत, मी या ठिकाणांतील लोकांना विशेषतः तरुण मतदारांनी रेकॉर्ड संख्येने मतदान करण्याची विनंती करतो," असे त्यांनी ट्विट केले.

आसाममध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये आज तिसर्‍या टप्प्यातील मतदान होत आहे. केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे आज एकाच टप्प्यात मतदान संपणार आहे. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या सर्व 30 जागांवर आज मतदान सुरू आहे.

पश्चिम बंगालमधील 31 विधानसभा जागांवर मतदान सुरू आहे. सुमारे 78 लाख 52 हजार 425 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर 205 उमेदवार रिंगणात आहेत. आसामच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 40 मतदारसंघात मतदान सुरू आहे. निवडणुकीसाठी  337 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 12 महिला उमेदवार आणि 325 पुरुष उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त केरळमधील 2.74 कोटी मतदार विधानसभेच्या 140 जागांसाठी मैदानात असलेल्या 957 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. तामिळनाडूमध्ये 3,998 आणि पुडुचेरीमध्ये 324 उमेदवार रिंगणात आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com