Assembly Election: पाच राज्यांसाठी भाजपचा प्लॅन, या दिग्गजांकडे सोपवली जबाबदारी
Assembly Election: BJP ready for war responsibility assigned to these veteransDainik Gomantak

Assembly Election: पाच राज्यांसाठी भाजपचा प्लॅन, या दिग्गजांकडे सोपवली जबाबदारी

त्यातच आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP) जेपी (J. P. Nadda) नड्डा यांनी निवडणुकीसाठी (Assembly Election) निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत.

देशातील सर्वच पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीत व्यस्त आहेत. त्यातच आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP) जेपी (J. P. Nadda) नड्डा यांनी निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. या अंतर्गत, प्रल्हाद जोशी यांना उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याच वेळी, लॉकेट चॅटर्जी आणि आरपी सिंह सह-प्रभारी हे दोन नेते उत्तराखंडचे प्रभारी असतील.(Assembly Election: BJP ready for war responsibility assigned to these veterans)

दुसरीकडे आख्या देशाचे लक्ष ज्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे त्या उत्तर प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान निवडणूक प्रभारी पदाचा कार्यभार स्वीकारतील. यासह राज्यात सात सह-प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर, अर्जुन मेघवाल, शोभा करंदलाजे, विवेक ठाकूर, सरोज पांडे, कॅप्टन अभिमन्यू आणि अनुपूर्णा देवी. त्याच वेळी, 6 संस्थेचे प्रभारी देखील बनवले गेले आहेत, ज्यात ब्रिजमधील संजीव चौरसिया यांचा समावेश आहे.पश्चिम यूपीचे संजय भाटिया, अवधचे सत्य कुमार, कानपूरचे सुधीर गुप्ता, गोरखपूरचे अरविंद मेनन आणि काशीचे सुनील ओझा यांची नावे आहेत.

गजेंद्र सिंह शेखावत यांना पंजाबमध्ये निवडणूक प्रभारी होण्याची संधी मिळाली आहे. तर येथे तीन सह-प्रभारी करण्यात आले आहेत. यामध्ये हरदीपसिंग पुरी, मीनाक्षी लेखी आणि विनोद चावडा यांच्या नावांचा समावेश आहे.

Assembly Election: BJP ready for war responsibility assigned to these veterans
Goa Election: मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर

मणिपूरमध्ये भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारी बनवण्यात आले, तर प्रतिमा भौमिक आणि अशोक सिंघल यांना सह-प्रभारी होण्याची संधी देण्यात आली आहे.

तर गोवा निवडणुकीचा विचार करता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूक 2022

2022 च्या सुरुवातीला एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी चार राज्ये अशी आहेत जिथे भाजप सरकार आधीच सत्तेत आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये मार्च-एप्रिल दरम्यान निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Assembly Election: BJP ready for war responsibility assigned to these veterans
Bihar: विधानसभेत भाजप आमदाराने 'हनुमान चालीसा' वाचण्यासाठी जागा आणि रजा मागितली

गोवा विधानसभा निवडणूक 2022

गोव्यातील निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्याकडे दिली जाईल अशी अटकळ होती कारण भाजपचा सगळा भर उत्तर गोव्यातील मतदारसंघावर आहे. फडणवीस यांनी अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. फडणवीस यांच्याकडे विधानसभेच्या 2007 मधीलय निवडणुकीवेळी साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती आणि तेथून त्यांनी भाजपचा उमेदवार विजयी केला होता.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची निवडणुकीची धुरा पी. चिदंबरम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरर्वड पक्ष यांची युती होणार का, आप फॅक्टर गोव्यात किती चालणार व शिवसेनेची येथे काय भूमिका असणार या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात स्पष्ट होतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com